Sindhudurg district ranks fourth in the state in computerization of city survey 
कोकण

सिटी सर्व्हे संगणकीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात चौथा 

विनोद दळवी

ओरोस - जिल्ह्यातील सिटी सर्व्हे झालेल्या सात गावांतील सर्व्हे नंबर नसलेल्या प्रॉपर्टी कार्डचे संगणकीकरण (डिजिटायझेशन) जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ऑनलाईन पद्धतीने प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. एकूण 42 हजार 77 कार्डांपैकी 37 हजार 240 प्रॉपर्टी कार्डांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. तेवढ्या मिळकत पत्रिका केंद्राच्या ई-महाभूमीवर अपलोड केल्या आहेत. आतापर्यंत 87 टक्के काम पूर्ण झाले असून राज्यात चौथ्या क्रमांकाचे काम झाले आहे. जिल्हा अधीक्षक भूमिलेख अधिकारी डॉ. विजय वीर यांनी ही माहिती दिली. 

पुर्वी नागरिक राहत असलेल्या जमिनी शासन किंवा वैयक्तिक नावे लावल्या नव्हत्या. नागरिक राहत असल्याने कर मिळणार नसल्याने त्या जमिनी गावठाण म्हणून नोंदण्यात आल्या; परंतु त्यांचे मालक शासन राहिले. त्यातील 1985 पूर्वी एक सिटी सर्व्हे झाला होता. त्यावेळी यातील काही जमिनींना सर्व्हे नंबर देण्यात आला; मात्र काही गावांचा हा सर्व्हे झाला नाही. त्यामुळे तेथील जमिनीला सर्व्हे नंबर मिळालेला नाही. जिल्ह्यात अशाप्रकारे एकूण 32 गावठाणे आहेत. यातील सात गावांचा सर्व्हे झाला नसल्याने त्यांना सर्व्हे मिळालेला नाही. त्यामुळे या गावातील अनंबरी जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डाचे संगणकीकरण सुरू केले आहे, असे यावेळी डॉ. वीर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात गावठाण असलेल्या 32 गावांमध्ये कुडाळ तालुक्‍यातील पाट, वालावल, सावंतवाडी तालुक्‍यात कलंबिस्त, चौकुळ, मसुरे, गेळे, फणसवडे, नेने, केगाद. कणकवली तालुक्‍यातील पियाळी, उंबरट, करंजे, नागवे, लोरे, दिगवळे, माईण, फोंडा. मालवण तालुक्‍यातील कट्टा, पिरावाडी, सडेवाडी, अपराधवाडी, बगाडवाडी, धामापुर, त्रिंबक. देवगड तालुक्‍यातील तोरसोळे, किंजवडे, वरेरी, लिंगडाळ, धालवली, रेंबवली. दोडामार्ग तालुक्‍यातील मोर्ले, घोडगेवाडी या गावांचा समावेश आहे. 
 
प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन 
जिल्ह्यातील दोडामार्ग व वैभववाडी तालुक्‍यात सिटी सर्व्हे झालेला नाही. बिन नंबरी असलेल्या 13 गावठाणमधील कुडाळ तालुक्‍यातील पाट, सावंतवाडी तालुक्‍यातील कलंबिस्त, देवगड तालुक्‍यातील तोरसोळे, किंजवडे, वरेरी, दोडामार्ग तालुक्‍यातील मोर्ले, घोडगेवाडी सात गावांतील प्रॉपर्टी कार्डचे संगणकीकरण सुरू केले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 42 हजार 77 प्रॉपर्टी कार्डचे काम करण्याचे उद्दीष्ट आहे. या प्रॉपर्टी कार्डाचे एडिटिंग करण्यात येत आहे. एडिटिंग पूर्ण झालेल्यांमधील 37 हजार 240 प्रॉपर्टी कार्डवर संगणकीकरण झालेले आहे. ही सर्व प्रॉपर्टी कार्ड केंद्राच्या वेबसाइटवर प्रकाशित केली आहेत. एवढी प्रॉपर्टी कार्ड आता ऑनलाईन उपलब्ध झाली आहेत, असे डॉ. वीर यांनी सांगितले. 
  
गावठाण क्षेत्रात सिटी सर्व्हे झालेल्या भागातील प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातही आतापर्यंत 87 टक्के काम झाले आहे. जिल्हा यात चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या नंबरवर मुंबई, द्वितीय चंद्रपुर, तृतीय पालघर जिल्हे आहेत. 
-डॉ. विजय वीर, जिल्हा अधीक्षक भूमिलेख अधिकारी 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT