Sindhudurg district those 10 people are corona negative 
कोकण

त्या दहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, सिंधुदुर्गला दिलासा

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात सापडलेल्या तिसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाच्या 19 व्यक्ती अतिजोखमीच्या संपर्कात आल्या होत्या. या सर्वांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन तपासणीसाठी पाठविले असून, त्यातील 10 व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी नऊ व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे.

22 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील असून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. 
वेळीच संस्थात्मक क्वारंटाईन केल्याने चौथ्या बाधित युवकाच्या संपर्कात केवळ 11 व्यक्ती आल्या आहेत. यातील सात व्यक्ती अतिजोखमीच्या, तर चारजण कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. अतिजोखमीच्या व्यक्तींना आयसोलेशनमध्ये, तर कमी जोखमीच्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे. 

सध्या जिल्ह्यात 683 व्यक्ती क्वारंटाईन आहेत. तो आकडा गुरूवारपेक्षा 128 ने वाढला आहे. 423 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. कालच्या संख्येत 112 ने वाढ झाली आहे. 260 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन असून, यातही 83 एवढी वाढ आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत 671 नमुने तपासणीसाठी पाठविले असून, 628 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. 76 नमुने आज पाठविण्यात आले. यातील 628 नमुने अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 624 अहवाल निगेटिव्ह, तर 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये आजमितीस 55 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य विभागामार्फत आज एकूण 4 हजार 214 व्यक्तींची तपासणी झाली. 

आरोग्य सेतू ऍप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करावे व कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्याबाहेर किंवा आत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आजअखेर 678 लोकांना पास दिले आहेत. त्यासाठी एसटी बसची व्यवस्था आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी 9 हजार 626 व्यक्तींनी नोंद केली आहे. राज्याबाहेर जाण्यासाठी 11 हजार 65 व्यक्तींनी नोंदणी केली आहे. 

सिंधुदुर्गात येण्यास 18 हजार इच्छुक 
सिंधुदुर्गात येण्यासाठी विविध जिल्ह्यांमधून सुमारे 18 हजार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. पैकी रेड झोनमधील हॉट स्पॉट व कंटेन्मेंट झोनमधील व्यक्ती वगळून 2448 व्यक्तींची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविले आहे. परराज्यातून जिल्ह्यात परतण्यासाठी 1396 व्यक्तींनी नोंद केली आहे. गोव्यातून सुमारे 700 व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमधून मिळून 469 व्यक्तींना जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Hinjewadi Metro: प्रवाशांना मोठा दिलासा! हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी चौदा मार्गांवर बससेवा; दोन कंपन्यांशी करार, पहिल्या टप्प्यात २० बस

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT