करूळ, कुंभवडेत दानपेट्या फोडल्या sakal
कोकण

सिंधुदुर्ग : करूळ, कुंभवडेत दानपेट्या फोडल्या

चोरटे सक्रिय : रोख रक्कमेसह घंटाही पळवल्या

एकनाथ पवार : सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : एका रात्रीत तालुक्यातील करूळ आणि कुंभवडे येथील तीन मंदीरा:तील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या. रोख रक्कम आणि घंटा देखील त्यांनी चोरट्यांनी लंपास केल्या. ऐन दिवाळीच्या धामधुमीत चोरटे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

तालुक्यातील कुंभवडे येथे एकविरा देवीचे मंदीर आहे. या मंदीरात आज सकाळी एकनाथ काशिराम राऊत हे पुजेसाठी गेले असता त्यांना मंदीरातील दानपेटी फोडलेली असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती मंदीर व्यवस्थापनासह वैभववाडी पोलीस स्थानकात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई आणि त्यांचे कर्मचारी कुंभवडे येथे पोहोचले. तेथील पंचनामा सुरू असतानाच करूळ गावठण येथील केदारलिंग मंदीर आणि करूळ भोयडे येथील गणपती मंदीरातील दानपेटी फोडण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी करूळ गाठले.

कुंभवडे येथील एकविरा मंदीराच्या दानपेटीत ५ हजार रूपये तर करूळ भोयडे गणपती मंदीरातील दानपेटी अंदाजे २००० रूपये तर केंदारलिंग मंदीरातील ५०० रूपये अशी एकुण ८ हजार रूपयांची रोखड चोरीस गेली. गणपती मंदीरातील दोन घंटा देखील चोरट्यांनी चोरल्या आहेत. एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन मंदीरातील दानपेट्या फोडल्यामुळे तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे. या चोऱ्यांमुळे दानपेट्या फोडणारे चोरटे पुन्हा सक्रीय झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चोऱ्यांमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

काही वर्षापुर्वी मंदीरातील दानपेट्या फोडण्याचे अनेक प्रकार तालुक्यात घडले होते. त्यानंतर पोलीसांनी रात्रीच्या गस्तीचे प्रमाण वाढविले होते. गेली दोन तीन वर्ष तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण त्या तुलनेत कमी होते; परंतु एकाच रात्रीत तीन मंदीरातील चोरी करून चोरट्यांनी पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT