Residents are encouraged to build small check dams to conserve rainwater amid drought-like conditions in Sindhudurg

 

Sakal

कोकण

Sindhudurg News : पाणी वाचवा, पाणी अडवा’चा संदेश घराघरांत; सोशल मीडियावर प्रबोधन; परतीच्या पावसापूर्वी छोट्या बंधाऱ्यांच्या उभारणीचे आवाहन

Sindhudurg Drought, Water Conservation, Small Check Dams सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून ‘पाणी वाचवा, पाणी अडवा’चा संदेश दिला जात आहे. परतीच्या पावसापूर्वी छोटे बंधारे उभारण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

ओरोस, : सिंधुदुर्ग जिल्ह्यावर प्रथमच दुष्काळाचे सावट गडद होत असताना आता ‘पाणी वाचवा, पाणी अडवा’ हा संदेश सोशल मीडियातून घराघरांत पोहोचू लागला आहे. ‘परतीचा पाऊस अजून होणे बाकी आहे... प्रत्येक वाडी, प्रत्येक ओढा; एक छोटा बंधारा !’ असे प्रबोधन व्हॉट्सॲप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमातून केले जात आहे. संभाव्य पाणीटंचाईविरोधात नागरिकांनी आतापासूनच तयारी करण्याचा संदेश त्यातून दिला जात आहे.

गावागावांत सामूहिक प्रयत्नांची गरज दरवर्षी मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात यंदा परिस्थितीने वेगळे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ‘’किती पाऊस पडला?’’ यापेक्षा ‘’पडलेला पाऊस किती अडविला?’’ हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे. परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन मिळणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी गावागावांत सामूहिक प्रयत्न सुरू व्हावेत, असे प्रबोधन केले जात आहे.

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जात असतानाच आता नागरिकांमधूनही पाणी अडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन होऊ लागले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील छोटे ओढे, नाले आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह याठिकाणी योग्य नियोजनातून छोटे तात्पुरते बंधारे उभारल्यास परतीच्या पावसाचे पाणी काही प्रमाणात अडविता येऊ शकते, हा संदेश यामधून दिला जात आहे.

एखाद्या मोठ्या योजनेची वाट पाहण्याऐवजी प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या परिसरातील योग्य ठिकाणे निश्चित करावीत, असे आवाहनही केले जात आहे. एका वाडीत पाच-दहा लोक एकत्र आले आणि छोट्या ओढ्यांमध्ये सुरक्षित पद्धतीने पाणी अडविण्याचे प्रयत्न झाले, तर गावागावांत मोठा परिणाम साधता येईल, अशी या मोहिमेमागील भूमिका आहे. दुष्काळाचा मुकाबला करणे ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचा सूर समाजमाध्यमांवरील संदेशांतून उमटत आहे.

घरगुती पाण्याचा काटकसरीने वापर, गळती रोखणे, उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर, विहिरी-बोअरवेलमधील पाण्याचा अनावश्यक उपसा टाळणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, अशा उपायांकडेही लक्ष वेधले जात आहे. छोटे बंधारे उभारताना मात्र नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे रोखला जाणार नाही, पूरस्थितीचा धोका निर्माण होणार नाही आणि सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शक्य तेथे ग्रामपंचायत तसेच जलसंधारणाशी संबंधित यंत्रणांचे तांत्रिक मार्गदर्शन घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय तिरंदाजांनी इतिहास रचला, महिला रिकर्व्ह गटात पहिलेवहिले गोल्ड! लव्हलिना बोर्गोहेनचा सुवर्ण'पंच'

Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला अटक, गोव्याला पळ काढताना मुसक्या आवळल्या; २ फरार

Punyashlok Ahilyadevi Loan Waiver Kolhapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा तिसरा टप्पा जाहीर; पाहा तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का?

Latest Marathi News Live Update : सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला स्थानिकांचा विरोध

Gold Rate Today: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार एवढे रुपये; पाहा ताजा भाव

SCROLL FOR NEXT