sindhudurg ke manjulaxmi Collector Alert order 
कोकण

सिंधुदुर्गमध्ये कोरोना सोबत आता भीती माकडतापाची; जिल्हाधिकाऱ्यांचे सतर्कतेचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : जिल्ह्यामध्ये कोरोनाची साथ सुरू असून ती आटोक्‍यात असली तरीही आता माकडतापाची साथ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून माकडतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या केएफडी (माकडताप) समन्वय समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जे. नलावडे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.


के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘जिल्हा रुग्णालयामध्ये मॉलिक्‍युलर लॅब तयार झाली आहे. माकडतापाच्या अनुषंगाने टेस्टिंगचे काम सुरू करण्यात यावे. त्यासाठी लागणारी अनुषंगिक उपकरणे व यंत्रणा सज्ज ठेवावी. साधनसामग्रीमध्ये काही उपकरणे कमी पडत असतील तर त्याचा प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे तातडीने पाठविण्यात यावा. या साधनसामग्रीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल. माकडताप रुग्णांना लागणारी औषधे तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठीची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. औषधांचा साठा आरोग्य यंत्रणेकडे तयार असावा. औषधे खरेदी करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल.’’ 

 जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी माकड मृत अवस्थेमध्ये आढळल्यास व ते कोणाच्याही निदर्शनास आल्यास संबंधितांनी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. 
- के. मंजुलक्ष्मी

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT