फेर सर्वेक्षणानंतर घाटमार्गाची लांबी वाढणार आहे.  sakal
कोकण

सिंधुदुर्ग आणि कोल्‍हापूर घाटमार्गाची लांबी वाढणार

घोटगे-सोनवडे मार्गाचे सिंधुदुर्ग हद्दीत फेर सर्वेक्षण; काम लांबण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

कणकवली: सिंधुदुर्ग आणि कोल्‍हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या घोटगे-सोनवडे घाटमार्गाची अलाइनमेंट चुकल्‍याने सध्या या घाटमार्गाचे सिंधुदुर्ग हद्दीत फेर सर्वेक्षण सुरू केले आहे. या फेर सर्वेक्षणानंतर घाटमार्गाची लांबी वाढणार आहे. वनविभागाची आणखी काही जागा घाटमार्गासाठी लागणार आहे. या वाढीव क्षेत्रासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाकडून पुन्हा परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्‍यामुळे अनेक वर्षे रेंगाळलेल्‍या या घाटमार्गाचे काम आणखी काही महिने लांबणीवर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

घोटगे-सोनवडे घाटमार्गासाठी गेल्‍या चाळीस वर्षांहून अधिक काळ स्थानिकांचा संघर्ष सुरू आहे. २०२० मध्ये घाटमार्गासाठी सर्व परवानग्‍या मिळाल्‍या. बजेटमध्येही बांधकामासाठी तरतूद करण्यात आली; मात्र टेंडर प्रक्रिया निश्‍चित करताना घोटगे-सोनवडे घाटमार्गाचे डिझाईन चुकल्‍याची बाब निदर्शनास आली. घाटामार्गाच्या तयार केलेल्‍या सध्याच्या अलाईनमेंटनुसार अवजड वाहने घाट चढू शकणार नव्हत्या. घोटगे-सोनवडे घाटमार्ग हा पुढील शंभर वर्षात वाढणाऱ्या वाहतुकीचा ताण विचारात घेऊन केला जात आहे. त्‍यामुळे वीस टनापेक्षा अधिक वजनाच्याही गाड्या या घाटमार्गातून जाऊ शकतील यानुसार घाटमार्गाचे डिझाईन तयार करणे आवश्‍यक झाले.

सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी आणि कुडाळ विभागाकडून घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या सिंधुदुर्ग हद्दीतील रस्त्याचे फेर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पूर्वी सोनवडे घाटमार्गाची लांबी ८ किलोमिटरची होती. यात कोल्‍हापूर हद्दीतील साडे तीन किलोमिटर लांबीच्या मार्गात कोणताही बदल होणार नाही. सिंधुदुर्ग हद्दीतील घाटमार्गाची लांबी वाढणार आहे.

साधारणत: मे अखेर पर्यंत या घाटमार्गाचे फेर सर्व्हेक्षण पूर्ण होणार आहे. त्‍यानंतर नवीन अलाईनमेंट तयार केली जाणार आहे. या नव्या अलाईनमेंटला केंद्राकडून परवानगी मिळाल्‍यानंतर, घाटमार्गासाठी लागणाऱ्या वाढीव जागेच्या भूसंपादनाबाबतची प्रक्रिया तसेच या वाढीव जागेला वन आणि पर्यावरण विभागाकडून मंजूरी मिळण्यासाठीचे प्रयत्‍न सुरू केले जाणार असल्‍याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

सध्या घाटमार्गातील २५,७६ हेक्‍टर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्‍यात आहे. या जागेच्या वन्यजीव, पर्यावरण आणि इतर सर्व परवानग्‍या घेण्यात आल्या आहेत. आता फेर सर्व्हेक्षणानंतर जेवढी जास्त जागा लागेल तेवढ्याच जागेच्या परवानगीसाठी विविध खात्‍यांकडे प्रस्ताव केले जाणार आहेत. दरम्‍यान नव्या अलाईनमेंटला परवानगी मिळाली की एका बाजूने घाटमार्गाचे काम सुरू होईल. तर त्‍याच दरम्‍यान वाढीव जागेच्या परवानगीसाठीही कार्यवाही सुरू केली जाणार असल्‍याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. सध्यस्थितीत कोल्‍हापूर हद्दीतील गारगोटी ते नाईकवाडीपर्यंत १२७ कोटी रूपये खर्च करून डांबरीकरण आणि मजबुतीकरणाचे काम सुरू आहे.

सोनवडे घाटामार्गात बोगदे, छोटे पूल, वन्य जीवांसाठी ओव्हर आणि अंडरपास आदी कामांचा समावेश आहे. जुन्या डिझाईननुसार काम सुरू केले तर नंतर त्‍यामध्ये बदल करणे कठीण होणार आहे. त्‍यामुळे सध्या फेर सर्वेक्षण करून घाटमार्गाची नवीन अलाइनमेंट तयार केली जात आहे. या नव्या अलाइनमेंटला परवानगी मिळाल्‍यानंतर घाटमार्गातील बोगदे, पूल, ओव्हर आणि अंडर पास तसेच घाटरस्ता अशी चारही कामे एकाच वेळी सुरू करता येईल, याची तयारी बांधकाम विभागाने केली आहे.

- दीपक मिरजकर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

ZP School Mathjalgav: पाच वर्गखोल्या धोकादायक, १२५ विद्यार्थ्यांसाठी एकच खोली; मठजळगावच्या शाळेची दुरवस्था

Latest Marathi News Live Update : 'मला हनुमानाने वाचवले': पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना स्मित मच्छार यांनी भगवद्गीतेचाही केला उल्लेख

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT