प्रशासकीय ई-कामकाजाची पद्धत जनतेसाठी फायदेशीर आहे sakal
कोकण

सिंधुदुर्ग : ‘रोअर्स’ पद्धतीने भूमापन गतिमान होईल

प्रशासकीय ई-कामकाजाची पद्धत जनतेसाठी फायदेशीर आहे.

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : प्रशासकीय ई-कामकाजाची पद्धत जनतेसाठी फायदेशीर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी समन्वय साधून पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविल्यास सेवा दिल्याचे खरे समाधान मिळेल. जमीन मोजणीमध्ये आलेली रोअर्स भूमापन पद्धत चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी प्रशिक्षणानुसार प्रात्यक्षिक करा. त्यामुळे भूमापन बिनचूक व गतिमान होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळातून जिल्ह्यातील आठही भूमी अभिलेख कार्यालयाला भूमोजणी करण्यासाठी आधुनिक जीएस १८ या मशिनरी देण्यात आल्या आहेत. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने केले आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या जुन्या सभागृहात हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. याची सुरुवात उपजिल्हाधिकारी मठपती यांच्या हस्ते झाली. यावेळी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक डॉ. विजय वीर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडाधिकारी विजय शिंदे, प्रशिक्षक तथा प्रकल्प व्यवस्थापक नितीन घाग, सेवा व्यवस्थापक पुष्कर व्यास आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक डॉ. वीर यांनी स्वागत केले.

डॉ. वीर म्हणाले, ‘‘भूमी अभिलेख कार्यालय आता आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. कोणतेही बदल एका दिवसात सुरू होत नाहीत किंवा संपत नाहीत. मोजणी तंत्रज्ञानामध्ये २००९-१० पासून बदल सुरू झाले. तर कार्यवाहीमधील बदल २०१२-१३ पासून सुरू झाले. आता ई-नोंदणी सुरू झाली आहे. मिळकत पत्रे, स्कॅनिंग व नकाशे डिजिटायझेशन पूर्ण झाल्याने शेतकरी शेतात बसून ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता तपासू शकतो. जिल्ह्याने मिळकत पत्रिका संगणकीकरण राज्यात प्रथम पूर्ण केले आहे.’’

जमाबंदी आयुक्तांचे प्रयत्न

जिल्ह्यात रोअर्स पद्धतीने भूमोजणीसाठी आवश्यक मशिनरी मिळण्यासाठी जमाबंदी आयुक्तांनी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांना या मशीन दिल्या आहेत. एका मशिनची किंमत दहा लाखांपेक्षा जास्त आहे. सहकार्याबाबत भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक डॉ. वीर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ethiopia Volcano Ash : मुंबई अन् दिल्लीपर्यंत पोहोचली इथोपियातील ज्वालामुखीची राख; अनेक विमानांची उड्डाणे रद्द, अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर

Maharashtra Local Body Elections : स्थानिक निवडणुकांबाबत आज सर्वोच्च' फैसला, राजकीय पक्षांची धाकधूक वाढली!

Pune Voter List: मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणूक घ्या; सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पुणे महापालिका प्रशासनाकडे मागणी

सोलापूरची ७२ चितळं विसावली सह्याद्रीत ! ; व्याघ्र प्रकल्पाला गती देण्यासाठी वन विभागाचे मोठे पाऊल..

SCROLL FOR NEXT