कोकण

अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने ४० घरे विजेपासून वंचित

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - वनविभागाकडुन वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत. हा प्रकार केवळ वनविभाग आणि वीज अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे घडल्याचे उघड झाले आहे. हे काम तातडीने पुर्ण करा, अन्यथा थेट संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू, असा इशारा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे दिला.

तालुक्‍यातील चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना गेल्या सहा वर्षांपूर्वीपासून आपल्या झोपड्यांत वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी केली होती त्या मागणीनुसार संबंधितांनी दोन वर्षापूर्वी तत्कालीन पंचायत समिती उपसभापती महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज कार्यालयासमोर उपोषण केले होते.

त्यानंतर त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. गेले काही महीने हे काम सुरू होते; मात्र विजेचे खांब घालण्यात येणारा काही भाग हा वनजमिनीत येत असल्याचे कारण पुढे करुन त्याठिकाणी विज कार्यालयाकडुन करण्यात आलेले काम रोखण्यात आले. आपली कोणतीही परवानगी न घेता काम सुरु ठेवल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे आपल्यावर गुन्हे दाखल होवू नयेत, या भितीने त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांनी विज खांब उभारण्याचे काम अर्धवट टाकले आहे. याबाबतची तक्रार आज तेथील समाज बांधवानी श्री. तेली यांच्याकडे केली. श्री. तेली यांनी आज उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली.

आपण एकविसाच्या शतकाकडे जात असताना एक आदीवासी समाजाची वाडी वीजेपासुन वंचित राहत असेल तर त्यापेक्षा दुदैवाची गोष्ट काही नाही, अशी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत दोन्ही कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधुन याबाबत योग्य तो तोडगा काढावा आणि ते काम पुर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.

याबाबत तेली यांची चव्हाण यांना जाब विचारला असता त्याठिकाणी काम करण्यास कायद्याने परवागनी मिळू शकते; मात्र तेथील जबाबदारी असलेले विज अधिकारी चुकीच्या पध्दतीने आमची कोणतीही परवागनी न घेता काम करीत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यांनी रितसर परवागनी मागितल्यास आमचा कोणताही विरोध असणार नव्हता; मात्र तशी प्रक्रिया संबंधितांकडुन झाली नाही. यावेळी राजू गावडे, सिताराम परब आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT