कोकण

पोलिस असल्याचा बनाव करून लुटल्याप्रकरणी कोल्हापूरच्या एकाला अटक

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - पोलिस असल्याचे सांगून सावंतवाडी येथील निवृत्त बँक अधिकारी सदानंद निकम यांना एक लाखाला लुटले होते. या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपुर येथील हैदर सरताजअली इराणी याला आज सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कोल्हापूर रेल्वेस्टेशन परिसरात अटक केली. दरम्यान त्याने झालेल्या प्रकाराची कबुली दिली आहे. आता त्याच्या सोबत कोण होते याचा शोध पोलिस घेत आहेत.

हा प्रकार तारीख 14 नोव्हेंबरला भटवाडी परिसरात घडला होता दुचाकीने आलेल्या हैदर व त्यांच्या अन्य साथीदारांनी आपण पोलिस आहोत पुढे चोरी झाली आहे. चोर पळाले आहेत तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे तुमचे दागिने काढून आमच्याकडे द्या, असे सांगून लुटले होते. याबाबत निकम यांनी सावंतवाडी पोलीसात चोरट्या विरोधात तक्रार दिली होती.

चोरीचा हा सर्व प्रकार भटवाडी येतील गुप्ता नामक व्यावसायिकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यामुळे चोरटयाचा शोध घेणे पोलिसांना शक्य झाले. हा तपास करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडाम यांनी दोन पथके नेमली होती. त्यानुसार आज सकाळी कोल्हापूर जयसिंगपूर भागात त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपण संबंधित लुटल्याने हैदर यांनी कबूल केले आहे. त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका साथीदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. हैदर याच्यावर कोल्हापूर परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या असतील असा सावंतवाडी पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अन्य गुन्ह्यांची चौकशी त्याच्याकडून करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत कोण होता, हे लवकरच उघड करू असा दावा पथकाचे प्रमुख सुभाष खंदारे यांनी केला आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शाहू देसाई  यांच्यासमवेत सुभाष खंदारे, अनिल धुरी, मनोज राऊत, ज्ञानेश्वर कांदळगावकर, अनुप खंडे, सुधीर सावंत, संतोष सावंत आदींनी सहभाग घेतला. उद्या त्याला तेथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात घडलेल्या अन्य गुन्ह्यांच्या चौकशीकामी पोलीस ठाण्यात त्याला ताब्यात देणार येणार आहे, असे खंदारे यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT