सावंतवाडी - येथे शिल्पग्रामची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. बाजूला नगराध्यक्ष बबन साळगावकर व अन्य.
सावंतवाडी - येथे शिल्पग्रामची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. बाजूला नगराध्यक्ष बबन साळगावकर व अन्य. 
कोकण

शिल्पग्राम'ला पंचतारांकीत हॉटेलचा दर्जा - दीपक केसरकर

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - पालिकेकडुन उभारण्यात आलेल्या शिल्पग्राम प्रकल्पाला पंचतारांकीत हॉटेलचा दर्जा प्राप्त करुन देण्यात येणार आहे. येत्या मे पर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने काम हाती घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे बैठकीत दिली.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार पालिकेच्या हेल्थफार्म मध्ये हेल्थ टुरीझम सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. आयुष मंत्रालयाकडुन देशात 22 ठिकाणी अशा प्रकारची केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. त्यातील एक केंद्र या ठिकाणी होणार आहे, असेही श्री. केसरकर म्हणाले.

येथील दौऱ्यावर असलेल्या श्री. केसरकर यांनी आज येथील शिल्पग्राम आणि हेल्थफार्मची पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर, वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, नगरसेवक आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, भारती मोरे, अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, माधुरी वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले, ""येणाऱ्या काही काळात येथे बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करायचे आहेत, तशी मागणी नगराध्यक्ष साळगावकर यांनी माझ्याकडे केली होती. त्यानुसार आज या प्रकल्पाची पाहणी दौरा केला आहे. येत्या काळात शहराला पर्यटनाच्या दृष्टीने मजबूत करण्याचा विचार आहे. त्यासाठी याठिकाणी येणारे पर्यटक विसावावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. पालिकेच्या शिल्पग्राम प्रकल्पाची जबाबदारी मुंबई येथील मंगेश दळवी या उद्योजकांनी घेतली आहे. त्यांना तीस वर्षाच्या करारावर हा प्रकल्प चालविण्यासाठी देण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून त्याठिकाणी पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी अधिकच्या सोई उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यात स्विमिंग टॅंक ते आपल्या खर्चाने बांधणार आहेत. कॉर्टर्सचे नुतनीकरण करण्यात आले आहे. अन्य आणखी काही इमारती बांधण्यात येणार आहेत. आता या प्रकल्पाला पंचतारांकीत हॉटेलचा दर्जा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पहिलाच हा प्रकल्प असणार आहे. त्यादृष्टीने चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून त्यासाठी निधी देण्यात येणार आहे. दुसरीकडे याठिकाणी संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने स्थानिक कला लोककला दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""केंद्रीय आयुष मंत्री नाईक यांनी हेल्थफार्मची पाहणी केली होती. यावेळी आयुष कडून देशात मंजूर झालेल्या 22 केंद्रापैकी एक केंद्र याठिकाणी देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानुसार याठिकाणी हे केंद्र सुरू करण्यासाठी आमच्या हालचाली सुरू आहेत. या केंद्रात मसाज, स्टीम बाथ, हर्बल स्टीम आदी सुविधा देण्यात येणार आहेत.''

नरेंद्र वनउद्यानात उभारणार झाडावरची घरे
श्री. केसरकर यांनी नरेंद्र उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, ""नरेंद्र डोंगरावर आता वन पर्यटन विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यात झाडावरची घरे, ट्रेकींग आदी पर्यटकांना आकर्षीत करण्यात येणारी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वनबागेकडे येणाऱ्या रस्त्याचा प्रश्‍न आहे; मात्र पुर्वी असलेल्या रस्त्यावर खडीकरण करण्यात येणार आहे. त्याशिवाय याठिकाणी दाखल होणाऱ्या पर्यटकांना निर्सगाच्या सानिध्यात राहण्याची संधी आणि जैवविविधतेची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT