कोकण

‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव

सकाळवृत्तसेवा

कणकवली -  समाजाच्या सर्वांगीण विकासाचे नाते जुळलेल्या ‘सकाळ’ने आधुनिक तंत्रज्ञानाला सोबत घेत समाजाच्या सकारात्मक बदलाचे विचार मांडत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी लावलेला हातभार हा कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी प्रोत्साहन देणारे लिखाण ‘सकाळ’ने मांडून नव्या पिढीतील तरुणांना व्यवसायासाठी दिलेले बळ ही ‘सकाळ’ची वेगळी ओळख असल्याचे मत आमदार नीतेश राणे यांनी आज येथे व्यक्त केले. 

‘सकाळ’ कणकवली कार्यालयाचा वर्धापन दिन आज साजरा झाला. कणकवलीतील विभागीय कार्यालयात आज सकाळपासून अनेक मान्यवरांनी भेटी देत ‘सकाळ’ परिवाराला शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाटचाल या पुस्तिकेचे प्रकाशन कणकवलीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अनेक मान्यवरांनी ‘सकाळ’च्या कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यात जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, कणकवलीच्या सभापती भाग्यलक्ष्मी साटम, मालवणचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, भाजप नेते संदेश पारकर, जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर, भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल, शिशिर परुळेकर, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, संतोष किंजवडेकर, समर्थ राणे, रमेश पावसकर, विजय परब, प्रभाकर सावंत, उदय जामसंडेकर, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, पशुधन अधिकारी डॉ. विठ्ठल गाड,  एसएमचे निलेश पारकर,  समीर सावंत, नंदकिशोर देसाई, आदर्श शिक्षक विद्याधर तांबे, लक्ष्मण राणे, आशियेच्या सरपंच रश्‍मी बाणे, स्वाती राणे, नगरसेवक सुशांत नाईक, प्रशांत वनसकर, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक किशोर राणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, संदीप राणे, सुशील पारकर, स्वतंत्र कोकणचे प्रदेशाध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर, प्रथमेश चव्हाण, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव मोहन पडवळ, संतोष राऊळ, चंद्रशेखर तांबट, भगवान लोके, तुळशीदास कुडतरकर, विशाल रेवडेकर, राजन चव्हाण, उमेश परब, अक्षय पावसकर, दिगंबर वालावलकर, स्वप्नील वरवडेकर, अनिकेत उचले, चंद्रशेखर देसाई, महेश सरनाईक, सुधीर राणे, रमेश जोगळे, संजय पेटकर, प्रदीप भोवड, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष दादा कुडतडकर, ॲड. दिपक अंधारी, ऋषीकेश कोरडे, दीपक बेलवलकर, कुंभार समाजाचे कोकण विभागीय उपाध्यक्ष विलास गुडकेर, दीपक राऊळ, भरत गावडे, कवी महेश काणेकर, सापळे शो-रूमचे मालक राजेश सापळे, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, बांधकाम व्यावसायिक उमेश वायंगणकर, ॲड. राजेंद्र रावराणे, छायाचित्रकार पप्पू निमणकर, संदीप खानोलकर, दीपक वारंग, अक्षरसिंधुचे संजय राणे, प्रा. हरीभाऊ भिसे, महानंदा चव्हाण, संजय बाणे, लीलाधर बांदेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत, प्रा. हरिभाऊ भिसे, पत्रकार विजय गावकर,कृषी विस्तार अधिकारी रवींद्र पाचपुते यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा नेते अतुल रावराणे आणि वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT