कोकण

हिंदू संस्कृती जपणारा नाट्यप्रयोग निर्माण करावा - रवींद्र तांबोळकर

सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले - ‘शेकडो वर्षांच्या हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. दशावतारी नाट्य कलाकारांसह हिंदू संस्कृती जपणारा, असा दशावतारी नाट्यप्रयोग निर्माण करावा. या नाट्यप्रयोगाची नाटके राज्यभर करून हिंदू संस्कृती व कला जपण्याचे काम विश्‍व हिंदू परिषद करेल,’ असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषद सिंधुदुर्गचे जिल्हामंत्री रवींद्र तांबोळकर यांनी केले.

खानोली येथील श्री विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी येथे आयोजित केलेल्या दशावतारी नाट्यमहोत्सवाचा समारोप संयुक्त दशावतारी नाट्यकलावंतांच्या नाटकाने झाला.

या वेळी नाट्यमहोत्सवातील मंगेश ऊर्फ दादा राणे, सुरेश धुरी, यशवंत चव्हाण-तेंडोलकर, संजय पाटील, महेश गवंडे, मारुती सावंत, नाथा गोसावी, गोसावी बुवा या ज्येष्ठ दशावतारी कलाकारांना  विश्‍व हिंदू परिषदेतर्फे स्मृतिचषक, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नाट्यमहोत्सवात सहभाग घेतलेल्या सर्व दशावतारी मंडळास मानधन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी श्री विठ्ठल पंचायतन खानोली-सुरंगपाणीचे व्यवस्थापक दादा पंडित, दशावतारी नाटकाचे पुरस्कर्ते दिगंबर नाईक, गोव्यातील उद्योजक तारक आरोलकर, अवधूत स्वार, सरपंच श्‍यामसुंदर मुणनकर, राजा सामंत, विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री रवींद्र तांबोळकर, दामोदर अभ्यंकर आदी उपस्थित होते.

महोत्सवासाठी सत्यब्राहृ पंडित, विनायक गावडे, मनिष कुबल, मिलिंद पंडित, आनंद दाभोलकर, निवेदक राजा सामंत, बाळा तांडेल यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT