कोकण

तळमळ एका माकडाला वाचविण्यासाठीची

अमोल टेंबकर

सावंतवाडी -  रुग्णांसाठी धावत जाणारा देवदूत जेव्हा एखाद्या मुक्‍याप्राण्यांसाठी धावाधाव करतो आणि त्याचे जीवन वाचण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्या मागे लपलेली माणूसकी ठळक होते. डॉक्‍टरबद्दल त्या ठिकाणी जमलेल्यांना आपसुकच आदर्श निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पहायला मिळाला. त्यामागे तेथील वैद्यकिय अधिक्षक उत्तम पाटील यांची तळमळ दिसून आली.

येथील कुटीर रुग्णालय परिसरात विजेचा मोठा ट्रान्सफार्मर लावलेला आहे. त्या ठिकाणी आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका माकडाने उडी घेतली; मात्र त्याची उडी थेट ट्रान्सफार्मरवर विजेच्या वाहिन्यावर पडली. त्याला विजेचा शॉक लागून ते माकड त्याच ठिकाणी पडले आणि परिसरातील सर्व वीजपुरवठा खंडीत झाला.

माकडाचा ओरडण्याचा आवाज ऐकुन परिसरातील लोक त्या ठिकाणी धावले. त्या ठिकाणचा प्रकार हृदयद्रावक होता. याबाबतची माहीती अधिक्षक पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. माकडाची स्थिती लक्षात घेता त्याला तात्काळ उपचाराची गरज होती. त्यामुळे पाटील यांनी ‘सकाळ’शी संपर्क साधुन वनविभागाची मदत मागितली. सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी पाठविले. शॉक लागलेल्या माकडावर उपचार करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या सर्व परिस्थितीनंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका डॉक्‍टरची मुक्‍या प्राण्यापोटी असलेली तळमळ लक्षात घेता त्यांनी रुग्णाच्या आशीर्वादासोबत प्राण्याचाही आर्शिवाद मिळविल्याची भावना त्या ठिकाणी जमलेल्या नागरीकांकडून व्यक्त करण्यात आली. 

यावेळी वनविभागासह विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत माकडाला जीवदान देण्यासाठी सहकार्य केले. ट्रान्सफार्मरवर वाढलेली जाळी तोडून त्याला तात्काळ मुक्त केले. त्यांच्या या जागरुकतेबाबत वनविभागाकडून सुद्धा त्यांच्या या कामाचा गौरव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT