sindhudurg police Brother found 
कोकण

पोलिसांच्या माणुसकीने वर्षभरानंतर बेपत्ता भाऊ सापडला

सकाळ वृत्तसेवा

आंबोली - मानसिक संतुलन बिघडल्याने येथे फिरत असलेल्या एकाला पोलिसांनी चौकशी करून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याच्या मूळ परभणी गावात रवानगी केली. वर्षभरानंतर भावाची भेट घडवून आणल्याबद्दल परभणीतील त्याच्या भावांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

आंबोली घाटात गेले काही दिवस मानसिक संतुलन बिघडलेला 35 वर्षाचा तरूण एका उघड्या मोठ्या पाईपमध्ये झोपत असल्याचे पोलीस जमादार आत्माराम तेली यांच्या लक्षात आले. आंबोली गावातही तो महिन्याभरापासून केव्हा तरी फिरकायचा; मात्र घाटात त्या पाईपमध्ये तो रात्रीचा राहायचा. पोलिसांनी तीन-चारवेळा शोध घेतल्यावर तो सापडला. आंबोली पोलिसांनी त्याची विचारपुस केली. त्यावेळी त्याने आपले नाव, पत्ता व नातेवाईकांचा मोबाइल नंबर लिहून दिला. त्यावरून त्याच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला. त्याचा भाऊ आंबोली पोलीस स्थानकात आला. पोलिसांनी त्याची भेट घडवली. यावेळी तो वर्षभरापासून बेपत्ता असल्याचे भावाने सांगितले. तो मोलमजुरी करत असून त्याला एक मुलगी आहे; मात्र पत्नी सोडून गेल्याचे त्याच्या भावाने सांगितले. संबंधित तरूणाने आपण गोव्यातून इथे आल्याचे सांगितले.

दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीबद्‌दल त्या कुटुंबाने आभार मानले. येथील सहायक उपनिरीक्षक आत्माराम तेली, हवालदार दत्ता देसाई, सुनील भोगण, दीपक शिंदे, अभिराज कांबळे यांनी त्या तरूणाची विचारपुस केली अन तो आपल्या घरी गेला. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT