Police raided an illegal gun manufacturing factory in Sindhudurg

 

Esakal

कोकण

कोकणात बंदुक निर्मिती कारखाना, मुद्देमाल जप्त; एकाला अटक

Sindhudurg News : कोकणात सिंधुदुर्गमध्ये बंदुक निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडालीय.

CD

सकाळ वृत्तसेवा कुडाळ, ता. २८ : निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५, रा. निरुखे सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली.

निरुखे सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध अग्निशस्त्रे तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने २७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निरुखे येथे छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ३ तयार अग्निशस्त्रे, बंदुकीचे ४ लाकडी बट, ६ लोखंडी बॅरल आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी संशयित जगन्नाथ मेस्त्री याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT