पावसाचा तडाखा sakal
कोकण

सिंधुदुर्ग : दोडामार्गला वादळी पावसाचा तडाखा

बागायतीचे नुकसान; ‘महावितरण’च्या सेवेतही व्यत्यय

सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्याला काल (ता. २७) रात्री वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दोडामार्ग तालुक्यात नुकसानीची तीव्रता अधिक आहे. विशेषतः कुंब्रल परिसरात वादळामुळे मोठी हानी झाली. गेले चार दिवस उष्मा प्रचंड वाढला आहे. काल रात्री दहाच्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुरू झाला. जिल्ह्याच्या अनेक भागांत याचा प्रभाव होता. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात याची तीव्रता वाढली.

वादळी वाऱ्‍यासह पावसालाही सुरुवात झाली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल आणि कोलझर परिसराला वादळाचा तडाखा बसला. तळकट, कोलझर भागांत वाऱ्‍याने नारळ, सुपारी बागांचे मोठे नुकसान झाले. कोनाळकट्टा आणि कुंब्रल येथे वित्तहानी झाली. कोनाळकट्टा येथे वीज पडल्याने अंगणातील सागाचे झाड अर्ध्यावरून मोडून पडले. फांद्या तुटून बाजूच्या गाडीवर पडल्या. कुंब्रल येथील बोर्डेकरवाडीत माड घरावर पडून घर कोसळले. विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्‍यासह जवळपास अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या कोसळल्या. महावितरणचेही नुकसान झाले. अनेक भागांत वीजपुरवठा विस्कळीत होता.

कोनाळकट्टा येथे राजन आरोलकर व प्रकाश कर्पे यांचे कालच्या पावसामुळे नुकसान झाले. वीज पडल्याने सागाच्या फांद्या गाडीवर पडून नुकसान झाले. कुंब्रल बोर्डेकरवाडी येथील संतोष बोर्डेकर यांच्या घरावर माड पडल्याने नुकसान झाले. दोन दुचाकींचीही मोडतोड झाली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी बोर्डेकर यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. सावंतवाडी तालुक्यातही ग्रामीण भागात वादळी पावसाने तडाखा दिला. शहरात विजेच्या तांडवासह पाऊस झाला. यामुळे उशिरापर्यंत वीजपुरठा खंडित होता. ग्रामीण भागात काही ठिकाणी, तर आज सकाळपर्यंतवीज बंद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT