sindhudurg sea area start a shooting location in devgad 
कोकण

सिंधुुदुर्ग बनतंय आता फेव्हरेट लोकेशन

सकाळ वृत्तसेवा

देवगड (रत्नागिरी) : लॉकडाउन शिथील झाल्यानंतर हळुहळु उद्योग व्यवसाय सुरू होत आहे. त्या अनुषंगाने चित्रपटासाठीचे चित्रीकरण होण्यास सुरूवात झाली आहे. कोकणचे निसर्गसौंदर्य चित्रपटसृष्टीला नेहमीच भूरळ घालणारे असल्याने आज देवगडात एका गाण्यासाठी चित्रीकरण सुरू होते. येथील समुद्रकिनारा परिसर, पवनचक्‍की भागात चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे स्थानिकांचीही यातील कलाकरांना पहाण्यासाठी उत्सुकता वाढली होती.

कोरोनाच्या काळात अनेक उद्योग व्यवसाय ठप्प होते. आता अनलॉकची प्रक्रीया सुरू झाल्यामुळे हळूहळू उद्योग आणि व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. यामध्ये आता चित्रपट क्षेत्रही मागे राहिले नसल्याचे चित्र होते. कोकणातील निसर्गसौंदर्य चित्रपट क्षेत्राला भुरळ घालणारे आहे. तालुक्‍याच्या विविध भागात चित्रपटाचे चित्रीकरण यापूर्वीही झाले होते. आता कोरोनानंतर पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. 

चित्रीकरणामुळे स्थानिक पुरक व्यवसायांना हातभार लागतो आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील उलाढालीत वाढ होण्यास मदत होत आहे. आज दिवसभरात येथील समुद्रकिनारा परिसर, पवनचक्‍की भागात हिंदी चित्रपटाच्या एका गाण्यातील काही भागांचे चित्रीकरण झाले. समुद्रकिनारा भागात चित्रीकरणाच्या निमित्ताने मोठी धांदल सुरू होती. यातील कलाकांराना पहाण्यासाठी स्थानिकांची धावपळ दिसून येत होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT