sindhudurg workers write letter maharashtra governor 
कोकण

राज्यपालांना एक पत्र, अन् प्रशासनाची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असताना गरजूपर्यंत मदतही पोहचवत आहे; मात्र असे असतानाही कामगाराने राज्यपालांना पाठवलेल्या एका पत्रामुळे तहसीलदार यांच्यासह सर्वच यंत्रणेची दोन दिवसांपूर्वी तारांबळ उडाली. 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने प्रशासन कामात गुंतलेले असतानाच मळगाव येथील एका फरशी कामगाराने, "संचारबंदीच्या काळात उपासमारी सोसत आहे. सरकारी यंत्रणेकडून मदत मिळत नाही. आम्ही कसे जगायचे?' अशा आशयाचे पत्र चक्क राज्यपाल कार्यालयाला पाठवून दिले. हे पत्र राज्यपाल कार्यालयाला मिळाल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलद्वारे याची माहिती देण्यात आली.

चक्क राज्यपाल कार्यालयाकडूनच ई-मेल आल्याने जिल्हा प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्हाधिकरी के. मंजूलक्ष्मी यांनी प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांना मळगाव येथील कामगाराच्या घरी पाठवले. यानंतर सरकारी लवाजमा कामगाराच्या घरी पोहचला; मात्र तेथे त्याच्या घरी असलेले चित्र बघून यंत्रणा गडबडून गेली. ही व्यक्ती कामगार असल्याचे सांगते आणि एका चांगल्या घरात भाड्याने राहते, तसेच घरात सर्वसाधारण सुविधा आहेत.

खाण्यासाठी पुरेसा अन्नसाठाही आहे. मग अशा व्यक्तीने राज्यपाल कार्यालयाची दिशाभूल करून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला वेठीस का धरले, असा प्रश्‍न त्याच्या घरी गेलेल्या प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे. एकूण या प्रकारामुळे या कामगारावरच गुन्हा दाखल होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT