हत्ती बनला दैत्य sakal
कोकण

Sindhudurga : शेतकऱ्यांसाठी हत्ती बनला दैत्य

सुतळीबॉम्ब यांच्या साह्याने हत्तींना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

प्रभाकर धुरी - सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग: हत्तींचे महाराष्ट्रातील आगमन देशातील पर्यावरणवाद्यांसाठी आनंददायी असले, तरी ज्यांना संकटाची झळ बसत होती, त्यांच्यासाठी हत्ती देव नाही तर दैत्य बनला होता. हत्तींच्या प्रत्येक पावलागणिक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होत होता. सुरुवातीला किरकोळ असणारा नुकसानीचा आकडा हजारोंवरून कोट्यवधी रुपयांवर पोचला. अजूनही हत्तींकडून नुकसान सुरूच आहे. बागायतदारांचे अपरिमित नुकसान होत आहे.

हत्तीला बांबू, कणक, भातपीक, केळी, फणस खूप आवडतात. हत्ती कवाथे, माड जमीनदोस्त करून वरच्या भागातील मऊ गाभा खातात. भेडले माड पाडून ते पायाने फोडून आतील गाभा ते खातात. काही झाडांच्या सालीही हत्ती खातात. हत्तींचा वावर असलेल्या भागात त्यांची क्षाराची गरज भागवण्यासाठी वनविभागाकडून मिठाच्या विटा जंगल भागात पसरून ठेवल्या जातात. तिलारी धरणात असलेला मुबलक पाणीसाठा, समृद्ध जंगल, भातपीक, फणस काजूची झाडे यामुळे हत्ती दोडामार्ग तालुक्यात स्थिरावले. मधल्या काळात त्यांनी सावंतवाडी, कुडाळ, मालवण तालुक्यासह गोवा राज्यातही प्रवेश करत मोठे नुकसान केले. कर्नाटकातील दांडेली भागातून आलेले हत्ती मांगेलीत उतरले. तेथे ते बराच काळ स्थिरावले. बेरोजगार युवकांनी फुलवलेल्या केळीच्या बागा हत्तींनी नाहीशा केल्या. वन विभागाने त्यांना रोखण्यासाठी एक कोटी रुपये खर्चून चर खोदले. मिरची आणि ऑईल लावलेले दोरखंड बांधले. अणकुचीदार लोखंडी खिळे ठोकून सिमेंटच्या भिंती उभारल्या, मधमाशांच्या पेट्या त्यांचा वावर असलेल्या भागात लावल्या. हत्तींचा वावर असलेल्या गावात हाकारा गट बनवून फटाके, अग्निबाण, सुतळीबॉम्ब यांच्या साह्याने हत्तींना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. तोही निष्प्रभ ठरला. मधल्या काळात हत्ती पकड मोहीमही राबवली; पण हत्तींनी तिलारी आणि दोडामार्ग काही सोडले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT