कोकण

शिपोळ्यातील शेतकऱ्याची २६ गुंठेत १० प्रकारच्या फळ भाजीपाल्याचे उत्पादन

शिपोळेतील शेतकरी काशिनाथ शिंदेंचे कष्ट; १ हेक्टर २६ गुंठे क्षेत्रावर मळा

सचिन माळी.

१० प्रकारच्या फळ, भाजीपाल्याचे उत्पादन

शिपोळेतील शेतकरी काशिनाथ शिंदेंचे कष्ट; १ हेक्टर २६ गुंठे क्षेत्रावर मळा

मंडणगड : तालुक्यात शिपोळे गावच्या खलाटी पाणथळ शेतातून विविध प्रकारची कडधान्ये घेण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. येथील शेतकरी काशिनाथ धोंडू शिंदे यांनी १ हेक्टर ३६ गुंठे क्षेत्रावर दहा प्रकारच्या भाजीपाला, फळ पिकाची लागवड केली आहे. अनेक पिकांचे यशस्वी प्रात्यक्षिक घेत पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे पर्याय दिला आहे.

मंडणगड-बाणकोट मार्गावर शिपोळे गाव आले की आजूबाजूचा हिरवागार परिसर लक्ष वेधून घेतो. येथील अनेक शेतकरी दुबार पिकं घेतात. काशिनाथ शिंदे ही अनेक वर्षांपासून शेतीच्या उत्पन्नातून आर्थिक स्रोत निर्माण करीत आहेत. गतवर्षी बटाटा, वाटाणा पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले. यावर्षी मिरची, मसूर, कुळीथ, उडीद, मूग, कलिंगड, रताळी, चवळी, मटकी, मेथी अशा दहा प्रकारच्या मिश्र भाजीपालाची १ हेक्टर ३६ गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे.

शेतात उत्पादित होणारा भाजीपाला ते वेसवी, देव्हारे या बाजारपेठा व आजूबाजूच्या गावात विक्री करून त्यातून अर्थार्जन करीत आहेत. त्यांच्या या मेहनतीला तालुका कृषी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी सुप्रिया घोडके, मंडळ कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी पर्यवेक्षक सजा उमरोली बी. वाय. ताठे, कृषी सहाय्यक अधिकारी वैभव शेगोकार हे मार्गदर्शन करून प्रोत्साहित करीत आहेत.

''भाजीपाला उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न आहेत. परिसरातील अनेक शेतकरी चांगल्या पद्धतीने आरोग्यास उपयुक्त अशा भाज्यांचे उत्पादन घेत आहेत.''

- वैभव शेगोकार, कृषी सहाय्यक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT