six corona positive patients in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत कोरोनाबाधित रुग्ण सहाच ; चुकीच्या पत्याने झाला घोळ

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८ दाखविण्यात येत आहे मात्र ती ६ इतकीच आहे. मुंबईतील २ रुग्णांनी आपला पत्ता रत्नागिरी दिल्याने राज्यस्तरावर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत रत्नागिरीतील रुग्णांचा आकडा ८ दाखवला जात होता. अनेक प्रसारमाध्यमांनी देखील ८ रूग्नसंख्या दाखवल्याने आकडेवारीचा घोळ निर्माण झाला आहे. मात्र आता याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.

मुंबईतील कांदिवली वेस्ट भागात राहणारी एक 26 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. प्रत्यक्षात ती 2 वर्षापासून तेथे राहत असली तरी नाव नोंदवताना मुळ पत्ता देवरुख संगमेश्वर असा नोंदला आहे. तसेच २४ वर्षीय तरुण रमाबाई आंबेडकर नगर वरळी येथे 10 वर्षापासून राहतो. तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला त्याचा मुळ पत्ता रत्नागिरी जवळील फुणगुस गावचा नोंदला आहे. या दोन नावांमुळे राज्यस्तरावर जारी आकडेवारीत रत्नागिरीचा आकडा ८ पॉझिटिव्ह रुग्ण असा दाखवला गेलेला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हयात कोरोना बाधितांचा आकडा अधिकृतपणे ६ असाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT