small fishing boat capsized in the sea at Sarjekot in vengurla sindhudurg 
कोकण

मालवणात नौका दुर्घटना : आठपैकी सात जणांना वाचवण्यात यश : एकजण बेपत्ता

प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) :  सर्जेकोट येथे समुद्रात छोटी मच्छिमार बोट उलटून दुर्घटना घडली. यात बुडालेल्या मच्छिमारांना वाचवण्यासाठी गेलेली दुसरी बोटही बुडाली. या दोन्ही दुर्घटनांमध्ये बुडालेल्या आठपैकी सात जणांना वाचवण्यात यश आले. एकजण बेपत्ता आहे. 


सध्या समुद्रात लाटांचा जोर वाढला आहे. आज सकाळी साडेसातच्या दरम्यान रमेश देऊलकर (वय 26), केशव कोंडबा (वय 24), परेश कोंडबा (वय 28), यशवंत देऊलकर (वय 30) हे छोटी नौका घेवून सर्जेकोट बंदराजवळील समुद्रात मासेमारीला गेले होते. लाटांच्या मार्‍यामुळे ही नौका उलटून मच्छीमार बुडू लागले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजू देऊलकर (वय 26), दिवाकर देऊलकर (वय 28), रजनिकांत देऊलकर (वय 24), प्रसाद आडकर (वय 28) हे दुसरी छोटी नौका (पात) घेवून समुद्रात उतरले; पण ही नौकाही समुद्राच्या लांटांमध्ये उलटली. वाचवायला गेलेले मच्छीमारही बुडू लागले. 


उपलब्ध माहितीनुसार आठ पैकी सात मच्छिमारांना किनार्‍यांवर आणण्यात यश आले. दिवाकर देऊलकर हे अद्याप सापडले नाही. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT