Snake Park Zoo Museum In Are Ware Ratnagiri Marathi News 
कोकण

प्राणी संग्रहालय, सर्प उद्यान  'येथे' होणार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी जयपूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर आरे-वारे येथे 70 एकर जागेवर प्राणी संग्रहालय आणि स्नेक पार्क उभारण्यात येईल. त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली असून वर्षभरात या कामाला सुरवात होईल, अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच जिल्हा नियोजनच्या 75 कोटीच्या मान्यतेची तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करीत यापूर्वीच्या मंजुरीची उलट तपासणी घेण्याचा इशारा दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जिल्हा पर्यटन विकास महामंडळासंदर्भात माझे मत चांगले नाही. आतापर्यंत या विभागाच्या अनास्थेमुळेच जिल्ह्याचा पर्यटन विकास रखडला आहे. पाचशे कोटी आणि सहाशे कोटी पर्यटन आराखडा आहे, सांगितले जाते. मात्र, प्रशासनानेदेखील वस्तुनिष्ठ माहिती दिली पाहिजे. आकडे फुगवून सांगू नका, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. ज्या एमटीडीसीला स्वतःचे रिसॉर्ट दुरूस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करता येत नाही. ते महामंडळ माचाळ आणि पर्यटन स्थळांचा विकास काय करणार, अशी कोपरखळी त्यांनी हाणली. जिल्हा नियोजन समितीच्या 75 कोटीच्या कामांना यापूर्वी मंजूरी दिली आहे. ही मंजूरी तपासून पाहून वर्कऑर्डर दिलेली कामे सुरू केली जातील. उर्वरित कामांची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यातील यात्रास्थळांसाठी असलेली 50 लाखाची तरतूद वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा - कॉंग्रेसमध्ये येथे पुन्हा एकदा नियुक्ती वाद 

तंत्रनिकेतन बंद पडू देणार नाही 

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद पडू देणार नाही. त्यातील त्रुटी दूर करून ते अद्ययावत करण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच याच परिसरामध्ये चांगले इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याचा माझा मानस आहे. विद्यापीठाना निधी देऊन नवसंजीवनी देण्याचा माझा मानस आहे. 

परप्रांतीय नौकांवर कारवाईच्या सूचना 

महाराष्ट्र सागरी हद्दीमध्ये पर्ससिन नौकांना बंदी घातली आहे. मात्र, आपल्या हद्दीमध्ये येऊन परप्रांतीय मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. या परप्रांतीयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मत्स्य विभागाला दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

Weekend Breakfast Special: रोजच्या पराठ्यांना द्या हेल्दी ट्विस्ट! वीकेंडला ट्राय करा पनीर स्टफ्ड बीटरूट पराठा

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १६ मे २०२६ ते २२ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

SCROLL FOR NEXT