... so the fear of a situation like kankavli 
कोकण

...तर कणकवलीसारखी परिस्थिती होण्याची भीती 

भूषण आरोसकर

ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल व ओरोस येथील रस्ता व पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. वेळीच लक्ष न दिल्यास येथे कणकवलीसारखी परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे येथील काम तत्काळ थांबवून संबंधित कंपनीकडून पुन्हा काम करून घ्यावे. ठेकेदार कंपनी आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) सिंधुदुर्ग अध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली. 

यावेळी चर्मकार समाजाचे दादा पाताडे, किशोर जाधव, प्रसाद सावंत, सुधाकर जाधव, सूरज जाधव, सोमा जाधव, आकाश कदम, सुशांत कदम आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काम निकृष्ट झाल्याने येथून प्रवास करणे धोक्‍याचे बनले आहे. पहिल्याच पावसात पुलांच्या अनेक भागातून पाण्याचे फवारे मारले जात आहेत.

अनेक भागांत पाणी साचत आहे. कणकवली सारखाच प्रकार ओरोस येथे घडू नये यासाठी सुरु असलेले काम त्वरित थांबवून योग्यरीतीने काम करून घ्यावे. निकृष्ट काम केल्याबद्दल कंपनी मालक, इंजीनियर व सबंधित अधिकारी यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही करून फौजदारी दाखल करावी, अशी मागणी केली आहे. 

वेताळ बांबार्डेतील डोंगर कोसळण्याची शक्‍यता 
आरपीआय जिल्हाध्यक्ष कदम यांनी यावेळी आणखी एक निवेदन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना दिले आहे. यात मुंबई-गोवा महामार्गासाठी लागणारी माती वेताळबांबार्डे येथील डोंगरातील खोदण्यात आली. प्रशासनाने करारनामा करून ही परवानगी दिली होती; परंतु ठेकेदार कंपनीने काही अधिकारी व जमीन मालक यांना हाताशी धरून बकायदेशीरपणे डोंगरच पोखरून काढला आहे. यामुळे भविष्यात हा डोंगर कोसळून जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जमीन मालक, सबंधित अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT