....तर मच्छीमारी सहकारी संस्था काळ्या यादीत 
कोकण

....तर मच्छीमारी सहकारी संस्था काळ्या यादीत

सहायक मत्स्य विभाग; अवैध मासेमारी रोखण्यासाठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : अवैध मासेमारी करणाऱ्या नौका ज्या मच्छीमार सहकारी संस्थेच्या सदस्य असतील त्या संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहायक मत्स्य विभागाकडून सर्व मच्छीमारी सहकारी संस्थांना देण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात होणाऱ्या अवैध मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमारांनी सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रार करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाने अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात करावयाच्या कारवाईचे नियोजन केले आहे. अवैध मासेमारी करणाऱ्या नौका पकडल्यानंतर इतर कार्यालयीन कारवाईबरोबरच तहसीलदारांच्या न्यायालयात खटलासुद्धा दाखल करण्यात येणार आहे. अवैध मासेमारी करणाऱ्या नौका ज्या मच्छीमार सहकारी संस्थेच्या सदस्य असतील, त्या संस्थांना संभाव्य कार्यवाहीबाबत अवगत करण्यात येत आहे. तरीही अवैध मासेमारी सुरूच राहिली तर संबंधित सहकारी संस्थेलाच काळ्या यादीत टाकण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटरचा समुद्र लाभला असून, ३ हजार ५१९ यांत्रिकी नौका तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका मासेमारी करतात. या अधिकृत नौकांव्यतिरिक्त ज्या नौकांनी मासेमारी होते ते अनधिकृत मासेमारी म्हणून ओळखली जाते. अशा काही नौका मच्छीमार सहकारी संस्थांच्या सदस्य असल्याने कारवाईबाबतची माहिती अशा संस्थांना कळवण्यात येत आहे. या संदर्भात सहायक मत्स्य विभागाने सहकारी संस्थांना दिलेल्या समजपत्रात नौकेला जो परवाना दिला आहे त्याच साधनसामुग्रीने मासेमारी करणे अनिवार्य आहे. अशाच नौकांना डिझेल कोटा मंजूर केला जातो. अनधिकृत मासेमारी म्हणजे ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन नेटने मासेमारी करताना नौका आढळून येणाऱ्या नौकेला डिझेल अनिवार्य नाही.

अशा अनधिकृत नौकांना डिझेल कोटा मंजूर केल्यास त्या संस्थेचा जो परवाना आहे तो रद्द करण्यासाठी कार्यवाही केली जाईल. या पत्रानुसार संस्थेने अंमलबजावणी न केल्यास त्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यासाठीही कार्यवाही केली जाईल, असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT