Special Konkan Trains For Holi Festival Ratnagiri Marathi News  
कोकण

होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - होळीसाठी मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होतात. त्यांच्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन कोकण रेल्वे मार्गावर केले आहे. पश्‍चिम रेल्वेकडून बांद्रा ते उडुपी दरम्यान दोन गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

बांद्रा - उडुपी - बांद्रा वातानुकूलित (090001 /090021) गाडी 8 मार्चला रात्री 11.55 ला सुटणार आहे. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता उडुपीला पोचेल. तिचा परतीचा प्रवास सोमवारी सायंकाळी 7 वाजता उडुपी येथून सुरु होईल. ती दुसऱ्या दिवशी बांद्रा स्टेशन येथे दुपारी पोचेल. ती गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्‍शन, कारवार, कुमटा, मुर्देश्वर, भटकळ येथे थांबेल. मूकंबिका रोड बेंदूर आणि कुंडापुरा स्थानकावर थांबणार आहे. या गाडीला टू टायर एसी 4, थ्री टायर एसी 8, एसी चेअर कार 5 आणि जनरेटर कार 2 असे 19 डबे आहेत. 

याच मार्गावर दुसरी विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. बांद्रा ते उडुपी (00000/010001) ही गाडी बांद्रा येथून 10 मार्चला 11.55 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी गाडी 6 वाजता दुपारी उडुपीला पोहोचेल. उडुपी - बांद्रा विशेष गाडी 11 मार्चला उडुपीहून सायंकाळी 7 वाजता सुटेल. ती गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्‍शन, कारवार, कुमटा, मुर्देश्वर, भटकळ येथे थांबेल. या गाडीला 22 डबे असून टू टायर एसी 1, थ्री टायर एसी 5, स्लिपर 10, सामान्य 3, पॅन्ट्री कार 1, जनरेटर कार 2 आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT