special story of sachin mali ratnagiri babasaheb ambedkar death anniversary in ratnagiri 
कोकण

महापरिनिर्वाण दिन : पित्याच्या आठवणीने गहिवरत बाबासाहेब

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : आदर्श पिता म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते सुभेदार रामजी सकपाळ यांच्या शिस्तीच्या कडक अंमलबजावणीमुळे बाबासाहेबांसारखा जागतिक कीर्तीचा विद्वान घडला. सुभेदार यांच्या निधनानंतर बाबासाहेबांना त्यांच्या आठवणीने कित्येकदा अश्रू अनावर झाल्याची आठवण सुदाम सकपाळ यांनी सांगितली. ते बाबासाहेबांच्या बालपण व विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देता

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘सकाळ’शी बोलताना सकपाळ म्हणाले, ‘‘ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीत सुभेदार रामजी सकपाळ १८६६ साली भरती झाले. ब्रिटिश सरकारच्या कायद्यानुसार सैनिकांच्या कुटुंबीयांना सक्तीचे शिक्षण केले होते. वडील सुभेदारांनी हेडमास्तर पदवी घेतली असल्याने बाबासाहेबांचे इंग्रजी उत्तम होत गेले. 

बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुभेदारांनी फार मोठ्या खस्ता खाल्या. पुस्तकांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना प्रसंगी मुली तुळसा व मंजुळा यांच्याकडे गळ घातली. त्यांनीही पेन्शन आल्यानंतर पैसे मिळतील, या विश्वासाने आपले दागिनेसुद्धा गहाण ठेवले. बाबासाहेबांना रात्री दोन वाजता अभ्यासाला उठवण्यासाठी ते रात्री जागेच राहात. त्यामुळे रात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत अभ्यास बाबासाहेब अभ्यास करीत. हळूहळू सवय लागली, हातात पुस्तक नसेल तर त्यांना चैनच पडत नसे. वकील झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराज हे बाबासाहेबांच्या भेटीला आले असता, बाबासाहेबांच्या नम्र स्वभावाबद्दल  बोलताना म्हणाले होते की, आम्ही परंपरेचे राजे तुम्ही तर ज्ञानाचे.

वाचनात हरवून गेले अन्‌ करवला शोधून आणला बाबासाहेब भावाच्या लग्नासाठी आपल्या मूळगावी आंबडवे येथे आले असताना लग्नाला जाण्यास वेळ आहे, म्हणून निसर्गरम्य परिसरात वसलेल्या ग्रामदेवतेच्या देवळात पुस्तक वाचत बसले होते. वाचनात ते एवढे मग्न झाले की त्यांना सर्व गोष्टींचा विसर पडला. 
शोधाशोध झाली असता कळले की ते देवळात वाचन करीत बसले आहेत. वाचनात हरवून गेलेला करवला शोधून आणावा लागल्याची आठवण सकपाळ यांनी सांगितली.

एक नजर

- सुभेदारांनी हेडमास्तर ही घेतली पदवी
- शिक्षणासाठी दागिनेसुद्धा ठेवले गहाण 
- रात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत अभ्यास
- राजर्षी शाहू महाराजांकडून ‘ज्ञानाचे राजे’ म्हणून गौरव

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनचालकांची गैरसोय; नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT