this is the speechless chief minister narayan rane comment kokan marathi news 
कोकण

ब्रेकिंग - 'हा तर मुका मुख्यमंत्री'.... कोण म्हणाले वाचा..

सकाळ वृत्तसेवा

 सिंधुदूर्ग : हा तर मुका मुख्यमंत्री आहे. देवाला वेळ देवू शकत नसेल तर लोकांना काय देणार अशी टिका खासदार नारायण राणे यांनी आंगणेवाडी येथे केली.

ग्रामस्थांनी केली  नाराजी व्यक्त 

भराडी मातेच्या दर्शनास आलेले मुख्यमंत्री ठाकरे हे काहीही भाष्य न करता निघून गेल्याने आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने नाराजी व्यक्त केली. ही बाब खासदार नारायण राणे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. ' हा तर मुका मुख्यमंत्री जो देवाला वेळ देऊ शकत नाही तो सर्वसामान्य जनतेला काय देणार?' अशा शब्दांत टीका केली.

खासदार राणेचे देवीला गार्‍हाणे

सध्या राज्यातील अनेक विकासात्मक कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. त्यामुळे राज्यात लोककल्याणकारी सरकार येऊ दे असे गार्‍हाणे श्रीदेवी भराडीला घालणार असल्याचे खासदार राणे यांनी सांगितले.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. आंगणे कुंटुंबयाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे (आंगणेवाडी)  लघुपाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे सुपूर्द केले. मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे काहीही भाष्य न करता निघून गेल्या नंतर श्री राणे यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही ते म्हणाले,  ' हा तर मुका मुख्यमंत्री जो देवाला वेळ देऊ शकत नाही तो सर्वसामान्य जनतेला काय देणार?' अशा शब्दांत टीका केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

Pune News: लोहगड दरीत तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; ४० हून अधिक साक्षीदार, डिजिटल पुराव्यांची सांगड

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

SCROLL FOR NEXT