Speed ​​up rice harvest at Achra konkan sindhudurg 
कोकण

पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग

महेश बापर्डेकर

आचरा (सिंधुदुर्ग) - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे. कापलेले भात वाळवायचे कुठे? त्यामुळे ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे, ते तातडीने भात झोडणीचे काम उरकून घेत आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे. 

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिंता आहे. येथील परिसरात खाडी लगतची, मळे शेतीत पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने भातशेती कुजू लागली आहे. बहुतांशी भागात भाताला कोंब आले आहेत. सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात कापणी केलेले भात वाळवायचे कुठे? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे. अशातच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे ते शेतकरी तातडीने भात झोडणी करुन मिळेल ते भात गोळा करत आहेत. 

वन्य प्राण्यांचाही उपद्रव 
अती कोसळणाऱ्या पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. माकड, डुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडूनही भुईमूग शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणासोबत वन्य प्राण्यांचाही त्रास वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले

Railway Ticket Upgrade : स्लीपरच्या पैशात AC चा प्रवास! तेही एकही रुपया जास्त न देता? जाणून घ्या काय आहे रेल्वेचा ऑटो अपग्रेड नियम

Pune: परवानगी नसेल तर सभा महागात पडणार अन्...; पुणे महापालिकेचे रॅली-सभांसाठी कडक नियम लागू

Capricorn Yearly Horoscope 2026: राहु, शनि आणि गुरु कसा बदलणार तुमचं आयुष्य; वाचा संपूर्ण वार्षिक राशीभविष्य

Kinder Joy: सावधान! किंडर जॉयमध्ये आढळले घातक बॅक्टेरिया; WHO सतर्क, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT