कोकण

लोटे एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; तिघे जागीच ठार

जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

मुझ्झफर खान

चिपळूण (रत्नागिरी) : लोटे (ता. खेड) एमआयडसीतील समर्थ केमिकल कंपनीत मोठा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. तिघांपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

येथील घरडा केमिकल कंपनीत काही दिवसांपूर्वी मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत मोठी जीवीतहानी झाली. ही घटना ताजी असतानाच आज समर्थ केमिकल कंपनीत स्फोटानंतर आगीची घटना घडली आहे. त्यामुळे कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता समर्थ केमिकल कंपनीत रिऍक्टरचा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट महामार्गवर दिसत होते. मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील लोकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले. धुर पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कंपनीच्या दिशेने धाव ठोकली. दरम्यान कंपनीत स्फोटाचे आगीत रुपांतर झाले होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर लोटे एमआयडीसीतील अग्मिशमन दल आणि मदत ग्रुपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.

तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. केमिकल कंपनीला आग लागल्यामुळे परिसरातील हवा दुषित झाली होती. त्यामुळे आग विझवणारे आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांनाही श्‍वसनाचा त्रास जाणवत होता. या आगीत तिघेजण जागीच ठार झाले, तर काहीजण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांना लोटे परिसरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे क्षेत्रील अधिकारी अजय चव्हाण घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT