st bus Road missed ratnagiri
st bus Road missed ratnagiri 
कोकण

रस्ता चुकला अन बस पोहोचली...! ; लोक बुचकळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : मुंबई व ठाणे परिसरात अत्यावश्‍यक सेवेसाठी एसटीचे कर्मचारी कमी पडत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून 15 कर्मचारी एका बससह ठाणे येथे पाठविण्यात आले आहेत. रत्नागिरी व चिपळूण येथील कर्मचारी घेऊन एसटी दापोली येथे आली. दापोलीतून 4 कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस मंडणगड येथे कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी सरळ न जाता आंजर्ले, केळशी मार्गे गेली. चालक रस्ता चुकला, असे कारण एसटीतर्फे देण्यात आले. मात्र, वेगळेच कारण असल्याची चर्चा आंजर्ले येथे सुरू आहे. 

रत्नागिरी जिह्यामधूनही ठाणे विभागात 23 कर्मचारी पाठविण्यात येणार होते. प्रत्यक्षात 15 कर्मचारीच ठाणे येथे गेले. रत्नागिरी व चिपळूण येथील एसटीचे चालक व वाहक घेऊन बस (एमएच-06-एस-9554) 5 एप्रिलला दापोली येथे आली. दापोलीतून 4 कर्मचारी घेऊन रात्री दहाच्या सुमारास ही बस मंडणगड येथील कर्मचारी घेऊन ठाणे येथे जाणार होती. मात्र, बस थेट मंडणगडकडे न जाता आंजर्लेत गेली. आंजर्लेतील ग्रामस्थांना सर्व एसटी बसेस बंद असताना ही बस कोठून आली, याचे आश्‍चर्य वाटले. गावकऱ्यांनी ही बस आंजर्ले येथे राम मंदिर थांब्यावर थांबवली. बसच्या चालकाकडे चौकशी केली. त्याने ठाणे येथे अत्यावश्‍यक सेवेसाठी जात असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यांना थातुरमातूर कारणे सांगण्यात आली. गावकऱ्यांनी तहसीलदार समीर घारे यांना माहिती दिली. त्यांनी दापोलीतील एसटीच्या एका कर्मचाऱ्याकडे याबाबत चौकशी केली असता, ही बस ठाणे येथे अत्यावश्‍यक सेवेसाठी कर्मचारी घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांच्या सूचनेनुसार ही बस ग्रामस्थांनी सोडून दिली.  ही बस आंजर्लेकडे गेलीच कशी, याबाबत आता चर्चा रंगत आहे. या सगळ्यात किमान जेवणाचा डबा तरी चालक वाहकाला मिळाला, अशी चर्चा आंजर्लेत सुरू आहे. 


कर्मचाऱ्यांना घेउन जाणाऱ्या या बसवर रत्नागिरी आगाराचा चालक होता व तो रस्ता चुकल्याने ही बस आंजर्लेकडे गेली. 
-श्री. वणकुद्रे, प्रभारी आगार व्यवस्थापक, दापोली आगार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT