ST buses going to Konkan are full Passengers are inconvenienced
ST buses going to Konkan are full Passengers are inconvenienced 
कोकण

कोकणात जाणाऱ्या एसटी बसेस फुल्ल; प्रवाश्यांचे हाल

अमित गवळे

पाली (जि. रायगड) - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटक देखील जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. परिणामी कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस फुल्ल जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच वाहनांची संख्या वाढल्याने मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गाड्यांना निश्चित स्थळी पोहचण्यास उशीर झाल्याने प्रवाश्यांचा खोळंबा होत आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी खूप वाढली आहे. माणगाव, इंदापूर, कोलाड, पेण व वडखळ आदी ठिकाणी वाहतूक कोंडी असते. तर काही वेळेस वाहतूक धिम्या गतीने सुरु असते. त्यातच मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने तर वाहतुकीवर आणखीच परिणाम होतो. सुट्यांसाठी अनेकांनी एसटी बसेसच्या बहुतांश जागांचे आधीच आरक्षण केलेले असते. त्यामुळे या बसेस खचाखच भरुन जात आहेत. महामंडळाने कोकणाकडे जाणार्या जादा गाड्या देखिल सुरु केल्या आहेत. मात्र त्या देखिल फुल भरुन जात आहेत. ज्यादा गाड्या मधल्या थांब्यान्वर थांबत नाहीत. तर शिवशाही व निम आराम बसमध्ये उभे प्रवाशी (स्टॅंडिंग शीट) घेत नाहीत. त्यामुळे प्रवाश्यांना तासंतास गाड्यांची वाट बघत थांबावे लागत आहे.

वेळेत आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी अनेक जण खाजगी प्रवासी वाहनांना पसंती देवून अधिकची रक्कम खर्च करुन खाजगी वाहने भाड्याने घेवून गावाकडे निघाले आहेत. याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे. ज्या लोकांना खाजगी वाहतूक परवडण्याजोगी नाही व ज्यांना जवळपासच्या ठिकाणी जायचे आहे. त्या लोकांना मात्र एस.टी.ची वाट पहावी लागते. कारण लांब पल्याच्या गाड्या त्यांना घेत नाहित व मधल्या थांब्यावर देखील थांबत नाही. तसेच बसेस गच्च भरुन गेल्याने अनेकांना उभे राहुनच प्रवास करावा लागतो. बहुतांश प्रवाश्यांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो. परिणामी वृद्ध, महिला आणि लहाग्यांचे मोठे हाल होत आहेत.

नियमांचे उल्लंघन -
बेशिस्त वाहनचालक, अवजड वाहने, लेन सोडून पुढे जाणारी वाहने तसेच महामार्गाचे सुरु असलेले काम यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलीस महामार्गावर ठिकठिकाणी तैनात आहेत. तसेच नाक्यांवर पोलीस चौक्या उभारल्या आहेत. परंतू महामार्गवारील वाहतुकीचा भार बघता पोलीसांवर वाहतुक कोंडी सोडवितांना ताण येत आहे.

माणगाव, वाकण व वडखळ नाक्यावर वाहतुक कोंडीचा अधिक भार -
मुंबई गोवा महामार्गावर वाकण नाक्याजवळ वाहतूक कोंडी होते. कारण पाली खोपोली मार्गावरुन येणारी वाहने आणि मुंबई गोवा महामार्गावरुन येणारी वाहने येथे एकत्र येतात. त्यामुळे वाहनांची गर्दी वाढते. तसेच वाकण नाक्यावर रस्त्याच्या कडेला अनेक वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना मार्ग काढता येत नाही. वडखळ नाक्यावर देखील मुंबईकडून आणि अलिबागकडून येणारी वाहने एकत्र येतात. तसेच रामवाडी ते वडखळ अरुंद मार्गावर लेन सोडून पुढे जाणारी वाहने, जेएसडब्ल्यू कंपनीची अवजड वाहने व बस यामुळे देखील येथे वाहतूक कोंडी होते. तसेच कोलाड जवळ असलेल्या अरुंद पुलांवर देखील वाहतुक धिम्या गतीने चालते. एका बाजुच्या गाड्या जाईपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

माणगावमध्ये सुद्धा वाहनांच्या रांगा -
अरुंद रस्ता, रस्त्यावरील हातगाडी व फेरीवाले, दुतर्फा उभी केलेली वाहने आणि वाहनांची जास्त संख्या यामुळे मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहरात देखिल वाहतुक कोंडी होत आहे. माणगाव गावातून मुंबई गोवा महामार्ग जातो येथे शहरातून डिव्हायडर टाकून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक धीम्या गतीने सुरू असते. प्रवाश्यांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून बसावे लागत आहे. पादचार्यांचे सुद्धा हाल होतात. वाहतूक पोलीस वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात परंतू वाहतुकीवर ताण आल्याने वाहतुक कोंडी सोडविणे जिकरीचे होऊन बसते.
 
वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यामुळे बसेसची वाट बघत तासंतास उभे राहावे लागते. सर्वच गाड्यांना उशीर होत आहे. बस भेटल्यावर देखील इच्छितस्थळी पोहचतांना खूप उशीर होतो. त्यामुळे प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. - छाया म्हात्रे, प्रवाशी, पाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT