कोकण

आंबोली घाटात आजपासून एसटी बस धावणार 

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - अतिवृष्टीत धोकादायक झालेला आंबोली घाटातून बंद असलेली एसटी वाहतूक उद्यापासून (ता.26) सुरू करण्यात येणार आहे. तसे पत्र आज बांधकाम विभागाकडून एसटी महामंडळाला दिले आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता ए. के. निकम यांनी दिली. 

आंबोली घाट रस्त्यावरील संरक्षक कठडे कोसळून तसेच मुख्य धबधब्यासमोर रस्ता खचल्याने सात ऑगस्टपासून या मार्गावरील एसटी वाहतुकीसह अवजड वाहतूक पूर्णतः बंद केली होती. खचलेला रस्ता लक्षात घेता धबधब्यासमोर असलेली कॉंक्रीटची भिंत तोडून तेथून छोटी वाहतूक सुरू ठेवली होती. सायंकाळनंतर पूर्णतः वाहतूक बंद होती. अलीकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली, चौकुळ, गेळे येथील लोकांसाठी मिनी बसची सोय केली होती. 

आंबोली घाट रस्ता बंद असल्याने कोल्हापूर, बेळगाव येथे जाणारे व्यापारी वर्ग तसेच प्रवाशांचे व मुख्यतः आंबोली, चौकुळ, गेळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले होते. शालेय विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक नुकसान सोसावे लागले. होणारी गैरसोय लक्षात घेता मंत्री केसरकर यांनी घाट रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस सुरळीत करा, असे आदेश बांधकाम विभागाला दिले होते. संरक्षण कठडा कोसळून अरुंद झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी दरडीचा काही भाग कापून रस्ता रुंद करण्याच्याही सूचना केल्या होत्या. मंत्री केसरकर यांनी केलेल्या सूचना व जवळ आलेला गणपती उत्सव सण लक्षात घेता बांधकाम विभागाने घाटाची डागडुजी केली आहे. त्यामुळे उद्यापासून या मार्गावरून एसटी पुन्हा धावणार आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकामचे श्री. निकम म्हणाले, ""घाटात कोसळलेल्या संरक्षक कठड्याच्या याठिकाणी बॅरल लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. कोसळलेले संरक्षक कठडे पुन्हा उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. एसटी प्रशासनाने घाटातून वाहतुकीबाबत विचारणा केली होती. त्याअनुषंगाने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता या मार्गावरून सायंकाळी सातपर्यंत एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे पत्रही एसटी महामंडळाला देण्यात आले आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सियाचं ४ महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न, चेतनसोबतच्या व्हॉटसअप चॅटमधून धक्कादायक खुलासा; केतनच्या खूनाबाबत काय बोलले?

HBD Dhoni: थाला इफेक्ट! पाकिस्तानला झोडण्यापासून ते तीन विश्वविजयापर्यंत... धोनीच्या करियमधील ७ सुवर्णक्षण

Latest Marathi News Update: गगनबावडा मार्गावर झाड कोसळले; कोल्हापूर-कोकण वाहतूक ठप्प

IND vs ENG 3rd T20I: भारत-इंग्लंड सामन्याची पुन्हा वेळ बदलली का ?... जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल मॅच...

'अरे, तेजश्री प्रधान कुठेय?' वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतील कलाकारांनी बनवली कांदाभजी, पण स्वानंदी गायब

SCROLL FOR NEXT