एसटीच्या फेऱ्या सुरू sakal
कोकण

सिंधुदुर्गातील ST च्या १७०० फेऱ्या सुरू

पाच महिन्यांच्या संपात ४५ कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

कणकवली: सिंधुदुर्गातील नियमित २१०० फेऱ्यांपैकी सध्या १७०० फेऱ्या सुरू झाल्‍या आहेत. तसेच या फेऱ्यांना प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याने एसटी महामंडळाला दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या एसटी फेऱ्यांमधून विभागाला प्रतिदिनी २८ लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तर पूर्वीच्या नियोजनानुसार अजूनही ४०० फेऱ्या सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. दरम्‍यान संपामुळे पाच महिने एसटी सेवा प्रभावित राहिली होती. यात सिंधुदुर्ग एसटी विभागाला ४५ कोटींचे नुकसान झाले आहे.

पाच महिन्याच्या संपानंतर सिंधुदुर्गात २२ आणि २३ एप्रिल रोजी संपावर गेलेले सर्व कर्मचारी हजर झाले. त्‍यानंतर पुढील पाच दिवस चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. तर महाराष्‍ट्र दिनापासून सिंधुदुर्गातील एसटी सेवा सुरळीत झाली आहे. विवाह समारंभासाठी जादा बसेस उपलब्‍ध करून दिल्‍या जात आहेत. तसेच एसटीची माल वाहतूकही पुन्हा सुरू झाली आहे. सिंधुदुर्गात एसटी विभागात २१२१ कर्मचारी आहेत. यातील १३५० कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग कायम ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT