कोकण

जलसंपन्न महाराष्ट्रासाठी अभ्यासक्रम सुरू करा- राजेंद्रसिंह राणा

शेती- हवामान बदलाची सांगड घालण्यासाठी कृषी विद्यापीठात टास्क फोर्स नेमा

- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर पाणीनियोजन होते. परंतु आता पाण्यावाचून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा जलसंपन्न बनवण्यासाठी जलउपयोग दक्षतेसंदर्भात पदवी अभ्यासक्रम सुरू केला पाहिजे. दुसरा उपाय म्हणजे पाठ्यपुस्तक मंडळाने प्रत्येक इयत्तेच्या पाठपुस्तकात पाण्याचे महत्त्व व महाराष्ट्राला जलसंपन्न कसे बनवावे, याबाबत धडा दिला पाहिजे. हवामान बदल आणि पाण्याचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. हवामान बदलामुळे पाऊसमान बदलल्याने शेतीतून उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी पाऊस व शेतीची सांगड घातली पाहिजे, असे प्रतिपादन जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदाच्या वतीने अल्पबचत सभागृहात एक दिवसीय जलपरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते झाले.

या वेळी राजेंद्रसिंह म्हणाले, जागतिक हवामान बदलामुळे पावसाचा पॅटर्न बदलत आहे. हे शेतकऱ्यांना समजण्यापलिकडे आहे. त्यामुळे शेतीचे चक्र बिघडले आहे व शेतीतून उत्पादन मिळत नाही. जिल्हाधिकारी हवामान बदल जाणतात. त्यामुळे बदलांचा अभ्यास करून कृषी विद्यापीठांना कामगिरी द्या. हवामान बदल आणि शेतीची सांगड घातल्यास शेती उत्पादन वाढेल.

ते पुढे म्हणाले की, यापूर्वी गुजरातमध्येही जलपातळी खाली जात होती. तेथे उपाययोजना करण्यात आला. परंतु आता महाराष्ट्रात हीच स्थिती आहे. जलपातळी वाढवण्यासाठी टास्क फोर्स बनवून त्याद्वारे आराखडा आखा. शेतकऱ्यांना समजावून सांगा. ही महत्त्वाची व तत्काळ करण्याची गोष्ट असून निसर्गाने हाक दिली आहे.

त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. हवामान बदल आणि पाण्याचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. हे समजून घेतले नाही तर महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. याकरिता आराखडा बनवण्याची गरज आहे. शेतीला पाण्याशी जोडले पाहिजे.

कोकण भगवंताचे लाडके

महाराष्ट्राला जलसाक्षरतेची सर्वाधिक गरज आहे. पाणी भरपूर आहे पण त्यामुळे त्याची किंमत नाहीये. पंचमहाभुते म्हणजेच भगवंत आहे. कोकण हा भगवंताचा सर्वांत लाडका प्रदेश आहे. येथे सर्वाधिक पाऊस पडतो. येथे भरपूर धरणे झाली. पण पाण्याची दक्षता घेतली जात नाही, असे राजेंद्रसिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT