Start Covid Center in 24 hours otherwise take to the streets Nilesh Rane warne kokan covid 19 marathi news 
कोकण

निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना:कोविड सेंटर 24 तासात सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरू

राजेश कळंबटे

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. लांजा तालुक्यात तर आरोग्य सुविधेअभावी कोविड रुग्णांचे खूप हाल असून कोणतीच शासकीय यंत्रणा रुग्णांसाठी सुविधा देताना दिसत नाही. याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना लांजात तत्काळ आरोग्य सुविधांसह कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेन सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. अन्यथा रुग्णांसाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरण्याची तयारी त्यांनी दर्शवली असून हा जिल्हा प्रशासनासाठी इशारा आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला किमान 100 पेक्षा अधिक होत आहे. असे असताना आरोग्यासाठी पायाभूत सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यातच जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात रुग्ण संख्या अधिक झाल्यामुळे रुग्णांसाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. कोविड केअर सेंटर देखील अपुरे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड आणि रत्नागिरी अशी फक्त 3 कोविड केअर सेंटर असून अन्य तालुक्यात कोणत्याही प्रकारे कोविड सेंटर उभारण्यात आले नाहीत. 

रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील तसेच गावांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी या रुग्णांना तेथिलच सुविधा असलेल्या कोविड सेंटरमध्ये भरती करून घेणे आवश्यक आहे. मात्र कोविड सेंटरच नसल्याने रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे असलेल्या सुविधांवर ताण येऊन अन्य रुग्णांवर त्याचा परिणाम होत आहे. लांजा तालुक्यातील पूर्वी असलेले कोविड सेंटर गेले अनेक महिने बंद असून तहसीलदार, प्रांत आणि तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करत आहे.

पुढील काळात रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनाने ही बाब हलकेपणाने घेतल्यास मोठी मनुष्यहानी होऊ शकते. याबाबत लांजा तालुक्यातील असंख्य रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी होत असलेल्या हालअपेष्टाबाबतीत माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या सर्व प्रकाराबाबत माजी खासदार भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधून लांजा तालुक्यात तात्काळ कोविड केअर सेंटर सुरू करावे आणि तेथील रुग्णांचे अन्य रुग्णालयात हलवताना होत असलेले हाल संपवावेत. याबाबत  लागलीच आरोग्य विभागाला आणि तालुका स्तरावर निर्देश देण्यात यावेत अशी सूचना निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली असून रुग्णांचे सातत्याने हाल होत राहिले  तर मात्र आक्रमक होऊन रुग्णांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावरही उतरू असा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला आहे.


लांजा तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजन देसाई यांनी कोविड केअर सेंटरसाठी निलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच राजन देसाई स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा करत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT