MSRTC
MSRTC sakal
कोकण

शाळेच्या वेळेत एसटी फेऱ्या सुरू करा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना महामारी आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील प्राथमिक शाळांची विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली म्हणजे ९० टक्के आहे. मात्र, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती चिंताजनक आहे. १९ हजार ३६७ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ६२५ विद्यार्थी उपस्थित असतात. एसटीच्या फेऱ्या वेळेत नसल्याने ही उपस्थिती घटली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करून एसटी महामंडळाने शाळांच्या वेळेत फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केली. यावर तत्काळ एसटी विभागाशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सभापती संजना माने यांनी दिले.

पंचायत समितीची मासिक सभा आज ता. १३ रोजी सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव आदी उपस्थित होते. अनेक सदस्य गैरहजर राहिले.

शिक्षण विभागाचा आढावा देताना प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुनील पाटील म्हणाले, शासनाच्या आदेशाप्रमाणे शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरीभागामध्ये आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू आहेत. काही शाळा सकाळी लवकर तर काही शाळा दुपारी सुरू होतात. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली आहे. ९०टक्के विद्यार्थी उपस्थित असल्याची आकडेवारी आहे. मात्र, माध्यमिक शाळांमधील उपस्थिती चिंताजनक आहे.

एसटीच्या फेऱ्या शाळेच्या वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचा उपस्थिती कमी आहे. तालुक्यात पाचवी ते आठवी या वर्गांमध्ये १९ हजार ३०७ विद्यार्थी पट आहे. शाळांच्या वेळेत एसटीच्या फेऱ्या नसल्याने ७ हजार ६२५ विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसत आहे. त्यासाठी एसटीचे अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, ते आढावा देऊन निघून गेले. याबाबत मुख्याध्यापक, एसटी विभाग यांची लवकरच बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे सभापती माने यांनी सांगितले. एसटी विभागाची माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, कोरोनापूर्वी तालुक्यातील ११२ एसटी फेऱ्या सुरू होत्या. त्यापैकी ८८ फेऱ्या सुरू आहेत. आठवडाभरात सर्व फेऱ्या सुरू केल्या जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT