state level abhang competition in ratnagiri most people win from konkan
state level abhang competition in ratnagiri most people win from konkan 
कोकण

राज्यस्तरीय अभंग गायनात कोकणकरांची मोहोर

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोकणातल्या स्पर्धकांनी आपला ठसा उमटवला. प्राजक्ता काकतकर (ठाणे) हीने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. तन्वी मोरे (रत्नागिरी) आणि महेंद्र मराठे (सिंधुदुर्ग) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. ज्येष्ठ गायिका विदुषी आशाताई खाडीलकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

स्वामी स्वरूपानंद विरचित अभंग गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा सहा विभागांत कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने प्रचंड प्रतिसादात झाली. यातून मुंबई- निळकंठ अंबये, महेश घाणेकर, श्रीधर घाणेकर, ठाणे- प्राजक्ता काकतकर, संजय बर्वे, उषा पाटील, पुणे- शुभांगी जोशी, रूपाली विखारे, केतकी दीक्षित व स्नेहल फडके (विभागून), रत्नागिरी- तन्वी मंगेश मोरे, मयुरेश जायदे व श्रीधर पाटणकर (विभागून), वैभव सोमण, सिंधुदुर्ग- महेंद्र मराठे, एकता खानोलकर आणि कोल्हापूर- हिमाली देवरुखकर, योगेश तावडे, प्रतीक पट्टणकुडे या स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. 

रविवारी (11) स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवातील कार्यक्रमात आशाताई खाडीलकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. स्पर्धाप्रमुख म्हणून सेवा मंडळाचे विश्‍वस्त हेमंत गोडबोले यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वरूपानंद समाधी मंदिर प्रमुख जयंतराव देसाई, अमर देसाई, कार्याध्यक्ष विजयराव देसाई, कार्यवाह हृषीकेश पटवर्धन यांच्यासह सहा केंद्रप्रमुखांचे सहकार्य लाभले. 

शास्त्रीय गायनाचे कौतुक 

स्पर्धक विजेत्यांशी आशाताईंची गाठ पडली, तेव्हा नाव ऐकताच अभंग गायन स्पर्धेतील तीच ना तू, अशी विचारणा तन्वी हिला केली. तिच्या गायनाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, अभंगातीलही नवीन स्वररचना या स्पर्धकांनी सादर केल्या आणि त्या शास्त्रीय संगीतावर आधारित होत्या, ही सर्वात सुखावणारी गोष्ट आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT