store onion and potato in market price down per kg 5 to 10 rs and 7 to 13 rs kokan sakal
कोकण

Onion And Potato Price : कांदा-बटाट्याचे भाव गडगडले

आवक वाढल्याने दरात घसरण; शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

तुर्भे : वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात साठवणुकीतील जुन्या कांद्याची आवक वाढली आहे; तर दुसरीकडे बटाट्याची आवकही वाढली आहे. परिणामी, कांदा-बटाट्याच्या दरात मोठी घसरण झाली असून कांदा प्रतिकिलो ५ ते १० रुपये, तर बटाटा ७ ते १३ रुपये प्रति-किलोने विकला जात आहे.

दीड ते दोन महिने राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन वाढले असून नवीन कांदा साठवणूक करण्यास शेतकऱ्यांकडे जागा अपुरी पडत आहे.

त्यामुळे साठवणीतला कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. सोमवारी बाजारात १३५ गाड्या कांदा आवक झाली होती. कांदा जुना असल्याने त्याचा पाला अधिक निघतो. परिणामी, बाजारात कांद्याला उठाव नसल्याने दरात घसरण झाली असून दुसरीकडे बटाट्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

सध्या बाजारात येणारा बटाटा हा परिपक्व नसल्याने त्याला उठाव नाही. त्यामुळे वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात बटाट्याचीदेखील घसरण सुरू असून ७ ते १३ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.

कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने त्याला उठाव नाही. परिणामी, दरात घसरण होत आहे. दुसरीकडे बटाट्याचीदेखील आवक वाढली आहे. त्यामुळे कांदा-बटाटामधील ही घसरण अजून पंधरा ते वीस दिवस अशीच राहणार असल्याची शक्यता आहे.

- मनोहर तोतलानी, कांदा-बटाटा व्यापारी, वाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

Google Photos चे मोठे अपडेट! जुन्या फोटोंना द्या रेट्रो लुक; नवीन 'मूड्स' अन् AI फीचर्स लाँच..पाहा 'हे' नवे बदल..

बिग बॉसची माजी स्पर्धक दिव्या शिंदेला अटक; डॉक्टरला केली मारहाण, ५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT