malvan
malvan 
कोकण

मालवण : पश्चिम किनारपट्टीवर चक्री वादळाचा परिणाम

सकाळवृत्तसेवा

मालवण : पूर्व किनारपट्टीवरील चक्री वादळाचा परिणाम आज पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले असून यात पाण्याचा प्रवाहात बदल झाल्याने अनेक मच्छीमारांच्या जाळ्या खडकात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. 

हवामान खात्याने पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ तसेच अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला होता. या वादळसदृश स्थितीचा परिणाम आज सकाळ पासूनच पश्चिम किनाऱ्यावर दिसून आला. वादळसदृश परिस्थितीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. समुद्रातील वारे दक्षिणेकडे वळल्याने त्याचा पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. यात मासेमारीसाठी गेलेल्या काही मच्छीमारांची जाळी पाण्याच्या प्रवाहात ओढली गेल्याने ती खडकात जाऊन नुकसान झाले आहे. 

वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्र खवळला आहे. सकाळच्या सत्रात काही मच्छीमारांनी मासेमारी केली. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका सायंकाळपर्यंत बंदरात परततील असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. 

वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्री वातावरणात बदल झाला आहे. समुद्र खवळल्याने उद्या होणाऱ्या अकरा दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी भाविकांनी, मच्छीमारांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT