story of 50 years married supriya and mahina in ratnagiri
story of 50 years married supriya and mahina in ratnagiri 
कोकण

मोहन, सुप्रिया यांचे अनोखे शुभमंगल; आयुष्य मध्यान्हीच्या टप्प्यात नवजीवनाची सुरवात

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : आयुष्यभर विविध ठिकाणी भटकत आणि एकटेपणामुळे ती दोघंही हातखंबा येथील माहेर संस्थेत दाखल झाली. माहेरमध्ये सुरक्षित वातावरण आणि आयुष्याच्या अखेरीस सोबती असावा या इच्छेमुळे ‘त्या’ दोघांचे सूर जुळले आणि एका संस्थेच्या पुढाकाराने ‘त्यांचा’ विवाहसुद्धा संस्थेमध्ये थाटामाटात झाला. आयुष्याचा आधार मिळवून देण्याचे काम संस्थेने केले. मोहन गुरव आणि सुप्रिया पाडाळकर असे या दांपत्याचे नाव आहे.

चार वर्षापूर्वी गुरव व सहा महिन्यापूर्वी पाडाळकर संस्थेमध्ये दाखल झाले होते. माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांच्या आशीर्वादाने व संस्था प्रकल्पप्रमुख सुनील कांबळे यांच्या पुढाकाराने हा विवाह झाला. माहेरमध्ये येण्यापूर्वी दोघंही समाजात एकटेच व रस्त्यावर, बसस्टँडवर राहून उदरनिर्वाह करीत होते. मोहन गुरव (वय 55) यांना साखरपा येथून पोलिस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईक नसल्याने माहेर संस्थेत दाखल केले तर सुप्रिया पाडाळकर (वय 50) यांना राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिपे व राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी राजापूर बसस्टँडवरून माहेरमध्ये दाखल केले.
विवाहसोहळ्यासाठी दानशूर लोकांची मदत मिळाली.

वधूच्या दागिने, पोषाखासाठी पूजा सुर्वे, प्राजक्ता पवार, रिया सावंतदेसाई, मैथिल नरक यांनी मदत केली. सजावट आणि हार, गुच्छ सचिन शिंदे, आइस्क्रीम सौरभ मलुष्टे यांनी दिले. जेवणासाठी विपुल सुर्वे आणि संदीप डोंगरे यांनी मदत केली. विनय मुकादम यांनी विवाह लावला. या वेळी पुणे माहेर संस्था सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी, मंगेश पोळ, बाळू साकोरे, सामाजिक कार्यकर्त्या मिरा गायकवाड, शीतल हिवराळे, अमित चव्हाण, रामदास पाटील, शिल्पा डांगे, सिता मिश्रा, विजया कांबळे, नंदिनी पाटील, श्रद्धा चव्हाण, अमित येलवे, जोसेफ दास, आशिष मुळ्ये, वैभव मुकादम, समर्थनगरमधील चंद्रशेखर चव्हाण आदी उपस्थित होते.

नवजीवनाची सुरवात

आयुष्याच्या मध्यानिच्या टप्प्यात या विवाहाने एकमेकांना आधार मिळाल्याने वधू-वराच्या चेहर्‍यावरील समाधान पाहण्याचा योग माहेर संस्थेमुळे आला. खर्‍या अर्थाने या जोडप्याची नवजीवनाची सुरवात झाल्याची भावना ल्युसी कुरियन व सुनील कांबळे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT