कोकण

गावच्या सीमा लाॅक: आचऱ्यात आजपासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन

सकाळ वृत्तसेवा

आचरा (सिंधुदुर्ग) : आचरा(Aachara) गावात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आचरा गावात सात दिवसांचा लॉकडाउन(Lockdown)करण्याचा निर्णय आज झालेल्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बाहेरील गावातील लोकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला असून गावच्या सीमा बंद करण्यासाठी सीमेवर स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेसह आचरा बाजारपेठ बंद ठेवली जाणार असून मेडिकल व्यावसायिकांनी अर्ध शटर बंद ठेवून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वरच औषधे देण्याच्या सुचना समितीतर्फे देण्यात आल्या आहेत. (strict-lockdown-7-day-in-acharya-from-today-kokan-marathi-news)

आचरा गावच्या आपत्कालीन समीतीची आणि ग्रामस्थांची बैठक ग्रामपंचायत आचराच्या सभागृहात सोमवारी सकाळी सरपंच प्रणया टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, पंचायत समिती सदस्य नीधी मुणगेकर, मंगेश टेमकर, माजी सरपंच राजन गांवकर,निलेश सरजोशी, जगदीश पांगे,अभय भोसले, ग्रामविकास अधिकारी गणेश परब, आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर,जयप्रकाश परुळेकर,अनिल करंजे, डॉ प्रमोद कोळंबकर पोलीस हवालदार सुनील चव्हाण,निखिल ढेकणे, पंकज आचरेकर, बँक अधिकारी चंदू कदम, पोलिसपाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, रिक्षा संघटनेचे सुनील आचरेकर आदी उपस्थित होते.

आचरा गावात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यात छोट्या मुलांनाही लागण झाली आहे, तसेच आचरा गावात खरेदीसाठी आलेल्यांमध्ये पाँझेटीव्ह लोकही बाजारपेठेत फिरून गेल्याची बाब उघड झाल्याने गावच्या सुरक्षेसाठी गावात कडक संचार बंदी करणे आवश्यक बनले होते. यादृष्टीने समितीच्या बैठकीत चर्चा होऊन कडक लाँकडाउन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यासाठी आचरे गावात येणाऱ्या कणकवली, देवगड, मालवण हिर्लेवाडी याभागातील सिमेंवर ग्रामस्थांमार्फत बंदोबस्त ठेवला जाणार असून अत्यावश्यक असेल त्यांनाच गावात प्रवेश दिला जाणार आहे.

उर्दू शाळेत कोविड सेंटर

बँकांनाही या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी ९ जून सकाळी सहा वाजल्यापासून बुधवार सोळा जून सकाळी सात वाजेपर्यंत कडक लॉकडाउन केले जाणार आहे. यावेळी वाढत्या कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेसाठी उर्दू शाळा येथे नविन कोविड सेंटर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT