कोकण

युती अभेद्य; तरीही गाफील राहू नका

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - महायुतीचा हा भव्यदिव्य आणि विजयी मेळावा आहे. एकजुटीचे जबरदस्त दर्शन आज घडले, तरी गाफील राहू नका. युतीबाबत आता शंका नाही; मात्र, कुठेही फट राहणार नाही, याची खबरदारी घ्या, असा सल्ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिला. येथील विवेक हॉटेलच्या मराठा मैदानावर महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी शिवसेना उपनेते, ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र वायकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार विनायक राऊत, शिवसेनेचे आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे बंदर विकासमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष बाळ माने आदी उपस्थित होते. युतीच्या शक्तिप्रदर्शनाने अनेकांचे डोळे दिपले. 

श्री. देसाई म्हणाले, ‘‘विरोधकांनी युती अभेद्य तरीही; गाफील राहू नका युतीबाबत अनेक अफवा पसरविल्या आहेत. युतीत अपशकून व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीचा विजय नक्की आहे, तरी गाफील राहू नका. या एकजुटीमुळे अनेकांचे डोळे विस्फारले असतील.’’ विनायक राऊत म्हणाले, ‘‘या भव्यदिव्य मेळाव्यात आज भाषण करणार नाही. गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भाऊ म्हणून मला जी वागणूक दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. या देवभूमीची सेवा करण्याची जनतेने पुन्हा मला संधी द्यावी.’’ 

मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘‘घटकपक्षांनी खूणगाठ बांधली आहे, की परत एकदा मोदी सरकार आणि श्री. राऊत निवडणून येणार. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. विजय आपलाच आहे. त्यामुळे आपले काम एकमेव धनुष्यबाण आहे. युतीबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका.’’ 

राणेंनी खासदारकीची वस्त्रे खाली ठेवून लढावे
महायुतीचा हा तर विजयी मेळावा आहे. राणेंनी खासदारकीची वस्त्रे खाली ठेवून राऊत यांच्याबरोबर लढावे. पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो, तोच जनतेचा विकास करू शकतो. फक्त आपला आणि मुलांचा पक्ष देशाचा आणि जनतेचा विकास करू शकत नाही. ही वस्त्रे खाली उतरली की प्रमोद जठार ती तुम्हाला मिळतील, असा मिश्‍कील टोमणाही त्यांनी लगावला.  

राऊत यांच्या मागे भाजप खंबीरपणे
प्रसाद लाड म्हणाले, ‘‘भाजप नाराज, भाजप नाराज’ असे प्रसारमाध्यमांनी पसरविल्याने विनायक राऊत ‘गॅसवर’ होते. मात्र, आज त्यांना शब्द देतो की कोकणातील महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता राऊत यांच्यावर प्रेम करतो. आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही. संघटनेला मानणारा कार्यकर्ता असल्याने निवडणुकीचे एकदिलाने काम केले जाईल. आम्ही राऊत यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT