success story of youth who cultivate sunflower farming in konkan ratnagirisuccess story of youth who cultivate sunflower farming in konkan ratnagiri 
कोकण

कोकणच्या लाल मातीत डोलले मक्याचे कणीस ; युवा शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून शेतीकडे पाहिले जात असताना युवा पिढी शेतीपासून काहीशी दूर जात असल्याचे बोलले जाते. याला तालुक्‍यातील कोतापूर येथील गणेश जानस्कर हा अवघ्या पंचवीशीतील तरुण अपवाद ठरला आहे.

घाटमाथ्यावरील शेतांमध्ये दिसणारे आणि कोकणामध्ये अपवादाने घेण्यात येणारे गव्हाचे पीक त्याने आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये घेतले आहे. त्याचे प्रमाण कमी असले तरी त्याच्या या अभिनव उपक्रमामुळे कोकणच्या तांबड्या मातीमध्ये गव्हाचे कणीस डोलू लागले आहेत. 

प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले वडील चंद्रकांत जानस्कर यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने केलेला प्रयोग शेतीपासून दूर जाणाऱ्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. गव्हाच्या पिकासह त्याने भुईमुग आणि सूर्यफुलाचे आंतरपीक घेतले आहे. कोतापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर गणेशने वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील सांगोलीवाडी कृषी महाविद्यालयातून बीएस्सी ॲग्रिकल्चर पदवी संपादन केली.

वडील चंद्रकांत जानस्कर शेतामध्ये विविध प्रयोग करून विविधांगी पिके घेत असल्याने घरामध्ये शेतीला पूरक वातावरण होते. वडिलांकडे असलेला अनुभव आणि स्वतः शिक्षण घेतल्याने शेतीविषयक असलेले ज्ञान याच्या जोरावर प्रयोगशील शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आई-वडिलांच्या सहकार्याने तो सत्यातही उतरविला. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते वसंत मोंडे यांची प्रेरणाही महत्वपूर्ण ठरली. 

जंगली श्‍वापदापासून शेतीची करतो राखण

गतवर्षी मक्‍याचे पीक घेणाऱ्या गणेशने यावर्षी गव्हाचे पीक घेतले आहे. ‘लोकवान’ या जातीच्या बियाण्याची सरी पद्धतीने शेतामध्ये लागवड केली आहे. त्याच्या जोडीला भुईमुगाची लागवड करून त्यामध्ये सूर्यफुलाचे आंतरपिक घेतले आहे. विहिरीच्या पाटाद्वारे या शेताला ते पाणी देतात. मिश्र खतासह शेणखताची मात्राही जोडीला दिली. गव्हाच्या रोपांची चांगली वाढ होऊन त्यावर कणीसही तयार झाली आहेत. शेताच्या बांधावर मचाण बांधून जंगली श्‍वापद आणि माकडांपासून शेतीची राखण करत असल्याचे तो सांगतो. 

कुटुंबीयांचे सहकार्य मोलाचे 

वडील चंद्रकांत, आई उज्ज्वला यांच्याकडे असलेला शेतीचा 
गाढा अनुभव भाऊ, वहिनी, चुलते, कृषी सहाय्यक एम. एच. महाले, श्री. भंवर, श्रीमती चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे तो सांगतो.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT