कोकण

वादळामध्ये गावखडी किनारा झाला उद्ध्वस्त तर ५७ कासवांना जीवदान

राजेश कळंबटे

रत्नागिरी: बदलत्या हवामानाचे आव्हान जैवविविधता(Biodiversity)जपण्यात आणि कासव संवर्धानातही (Turtle breeding)आहे. गतवर्षी कोकण किनाऱ्‍याला ’निसर्ग’ (nisarg,tauktae) आणि यावर्षी तौक्ते वादळाने त्यात भर घातली. आधीच कासव विणीचा हंगाम थोडासा पुढे ढकलला गेला आहे. त्यात वादळांची भर पडूनही कासव संवर्धनाचे आव्हान थोडासा धोका पत्करुन गावखडीच्या कासवमित्रांनी यशस्वीपणे पेलले. कासवांच्या अंड्यांची दोन वेळा हाताळणी अत्यंत कौशल्यपूर्ण झाल्याने १२० पैकी ५७ कासवांना जीवदान मिळाले.

successful-protection-of-turtle-eggs-from-cyclone-kokan-ratnagiri-marathi-news

या मोहीमेचे शिल्पकार आहेत, कासवमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील आणि त्यांच्या मार्गदर्शक संशोधक सुमेधा कोरगावकर. कोरोनातील परिस्थितीसह निसर्गातील बदलांचा परिणाम कासवांचा विणीचा हंगाम 2 महिने पुढे गेला होता. त्यात तौक्ते चक्रीवादळाचे सावट कासव संवर्धन मोहिमेवर निर्माण झाले होते. रत्नागिरीतील गावखडी येथील कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी त्यांची अंडी वाचवण्यासाठी सर्वप्रथम पावले उचलली होती. तौक्ते वादळापूर्वी गावाखडी किनाऱ्‍यावरील घरटी 'मिड स्टेज'मध्ये म्हणजेच २८ दिवस झाल्यामुळे अंडी उबवण्याच्या स्थितीत होती.

वादळाचा संदेश पाहता, ती कुठे ठेवायची, हाच मोठा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. त्यांनी घमेल्यात वाळू घेऊन त्यावर पाईप ठेवला. डिंगणकर यांचे सहकारी राकेश पाटील यांनी अंड्यांना धक्का न लावता काळजीपूर्वक ती हलवली. कासव संवर्धनात अंडी हाताळणे सर्वात महत्वाचे असते. त्या दृष्टीने भक्कम बांधलेल्या झोपडीत वाळूने भरलेली ती घमेलं ठेवली. यामध्ये सुमारे १२० अंडी ठेवण्यात आली. तौक्ते वादळ येऊन गेल्यानंतर रोज ती घमेलं बाहेरील हवेत आणून ठेवली जायची. पुढील पंधरा दिवस हा उपक्रम नित्यनियमाने सुरू होता. ५ ते ६ जूनला घमेल्यात ठेवलेली पिल्ले बाहेर येऊ लागली. अंड्यातून पिल्लं बाहेर पडताच सर्वांना सुखद धक्का बसला. या प्रयोगामुळे सुमारे ५७ पिल्लांना जीवदान मिळाले.

१४ मे रोजी पावले उचलली

वादळात ती अंडी पाण्यात राहिली तर पुढील भवितव्य अंधारात हे निश्‍चित होते. हेच लक्षात घेऊन गावखडीतील कासवमित्रांनी १४ मे रोजी डिंगणकर आणि पाटील यांनी पावले उचलली. प्रयोगासाठी त्यांनी पाहिजे तसा सेटअप् तयार केला. अंडी हॅचरीमधून हलवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्याही वनविभागाकडून त्यांनी घेतल्या होत्या.

तौक्ते वादळामध्ये गावखडी किनारा समुद्राच्या लाटांमध्ये उद्ध्वस्त झाला. या परिस्थितीमध्येही कासवांची अंडी जपून ठेवली. त्यामधून पिल्लं बाहेर आल्यानंतर आमचा प्रयोग यशस्वी झाला. यामध्ये कासवावर संशोधन करणाऱ्‍या सुमेधा कोरगावकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांनीही हा प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

- प्रदीप डिंगणकर, कासवमित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT