Konkan Politics esakal
कोकण

कोकणात शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजानीमा, राजकीय चर्चांना उधाण

मयेकर यांच्या राजिनाम्यानंतर राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

'भविष्यात पक्षाने संधी दिल्यास विधानसभेची निवडणूकही लढवण्यास तयार आहे.'

रत्नागिरी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर (Sudesh Mayekar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा देत असल्याचे मयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मयेकर यांच्या राजिनाम्यानंतर राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.

मयेकर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राजीनाम्याबाबत ते म्हणाले, जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वीच ह्रदयाची अ‍ॅन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. मागील दोन महिन्यांपासून सततच्या फिरतीमुळे पुन्हा अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा देत आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले आहे.

या पुढेही आपण राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार आहे. भविष्यात पक्षाने संधी दिल्यास विधानसभेची निवडणूकही लढवण्यास तयार आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी आपल्याला ३१ हजाराहून अधिक मते मिळाली होती. मतदारसंघातील जनतेने विश्वास ठेवून पाठिंबा दिला होता.

रत्नागिरी शहर व तालुक्यातील कार्यकर्ते आजही संपर्कात आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे ठाम उभे राहिलो होतो. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात तालुकाध्यक्षांच्या नव्याने नियुक्तीही करुन चांगल्या पद्धतीने कामकाजाला सुरवात केली.

अंतर्गत धुसफूस?

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रत्नागिरी कार्यकारिणीतील पद बदलावरून गेले काही दिवस धुसफूस सुरू होती. जिल्हाध्यक्ष मयेकर यांचा राजीनामा त्याच कारणातून दिला गेला असल्याची चर्चा पक्षीय वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्ष पदावर आल्यानंतर मयेकर यांनी ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांना एकत्र आणून काम करण्यास सुरुवात केली होती. चिपळूणमधील बैठकीत झालेला पक्षांतर्गत वादही त्यांनी चांगल्याप्रकारे हाताळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT