Suggestions to reduce the names of deceased beneficiaries 
कोकण

मृत लाभार्थींची नावे तात्काळ कमी करण्याच्या सूचना 

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले - तालुक्‍यातील सर्व रास्त भावाच्या धान्य दुकानानिहाय शिधापत्रिकांमधील मृत व स्थलांतरीत लाभार्थींची नावे तात्काळ कमी करण्यात यावीत, अशा सूचना आमदार दीपक केसरकर यांनी केल्या.

जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशानुसार तालुका व नगरपरिषद दक्षता समिती गठीत करण्यात आल्यानंतर त्यांची पहिली येथील तहसिल कार्यालयात आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

सभेत श्री. केसरकर यांनी मार्गदर्शन करुन राष्ट्रीय अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनांचा इष्टांक तपासून आवश्‍यक त्या वाढीव इष्टांकाची मागणी करण्याबाबतचे पत्र शासन सादर करा. तालुक्‍यातील सर्व रास्त भावाच्या धान्य दुकानानिहाय शिधापत्रिकांमधील मृत व स्थलांतरीत लाभार्थींची नावे तात्काळ कमी करण्यात यावीत. केरोसिन पात्र लाभार्थींना आवश्‍यक केरोसिन उपलब्ध होण्यासाठी किरकोळ केरोसिन दुकान निहाय पात्र शिधापत्रिकांच्या याद्या घेण्यात येऊन गॅसधारक शिधापत्रिका वगळून साठा निश्‍चित करावा. तालुक्‍यातील आंबा बागायतदार, मच्छिमार नौका यांना व दहन प्रक्रियेसाठी आवश्‍यक तो केरोसिन साठा फि-सेलमधून उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा. खानोली, वायंगणी रास्त भावाचे धान्य दुकान त्याच गावात सुरु होण्यासाठी नव्याने जाहीरनामा काढण्यात यावा. गावनिहाय बचतगटांना ही धान्य दुकाने देण्यासाठी आवश्‍यक ती बैठक आयोजित करावी, अशाप्रकारच्या सूचना संबंधितांना दिल्या.

यावेळी तहसीलदार प्रविण लोकरे, तालुका पुरवठा अधिकारी प्रितम वाडेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्यासह नगरपरिषद दक्षता समिती सदस्य मंजूषा आरोलकर, श्‍वेता हुले, महेश डिचोलकर, कासिम शेख, लवू तेरसे, पेद्रु लॉड्रीक्‍स, महादेव शिरसाट, वृषाली जाधव तसेच तालुका दक्षता समिती सदस्य सुचिता वजराठकर, मनाली हळदणकर, नम्रता बोवलेकर, योगेश कुबल, दिपक जाधव, झिलू गोसावी, सुधाकर राणे व तालुका गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT