suicide attend a businessman in ratnagiri yesterday down 
कोकण

मृतदेह पाहिला आणि एकच खळबळ उडाली ; बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिर : येथील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याने रत्नागिरी हादरली आहे. हा प्रकार पहाटे साडेपाचच्या सुमारास निदर्शनास आला. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका महिलेला त्यांचा मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला. चंद्रकांत शांतिलाल पटेल असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

चंद्रकांत पटेल यांनी पहाटे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. पहाटे साडेपाचला मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेला त्यांचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. शहरातील माळनाका येथील तारा ऑर्किड येथे चंद्रकांत पटेल वास्तव्याला होते. 

विशेष म्हणजे एक दिवस आधीच ते त्यांचे मूळ गाव राजकोट (गुजरात) येथून रत्नागिरीला परतले होते. येताना ते सोबत त्यांच्या वडिलांना घेऊन आले होते. दोन महिन्यांपूर्वी लॉकडाउन उठल्यानंतर ते आपल्या मूळ गावाला गेले होते. तिथे गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर त्यांनी यशस्वी मात केली. दोन महिने ते घरीच होते. एक दिवसापूर्वी ते वडिलांसह रत्नगिरीत परतले होते.

पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. रत्नागिरीत त्यांचे स्वतःच्या मालकीचे तीन ते चार फ्लॅट आहेत. असे असताना गावातून परतल्यानंतर अचानक आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT