suicide attend a married woman in sawantwadi sindhudurg 
कोकण

गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या ; कारण मात्र अस्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : येथील उभा बाजार विठ्ठल मंदिराशेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. दिपाली दशरथ शिंदे (वय 56), असे तिचे नाव आहे. तिने आत्महत्या का केली? याबाबतचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत दशरथ गोपाळ शिंदे याने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आत्महत्येची नोंद झाली आहे. 

याबाबत ठाणे अंमलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी सकाळी नेहमीप्रमाणे कुटुंबियांना चहा दिला. यानंतर कोणालाही कल्पना नसताना स्वयंपाक घरात जाऊन बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी घरात असलेल्या सदस्यांनी हाक दिली असता कोणताही प्रतिसाद न आल्याने स्वयंपाक घरात जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. पोलिस हवालदार मनोज राऊत यांनी पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस महेश जाधव आणि प्रसाद कदम करत आहेत.  
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT