कोकण

व्यावसायिकांना व्यवसायासाठी मोकळीक द्यावी : शेखर निकम

सर्व व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मोकळीक द्यावी

सकाळ डिजिटल टीम

चिपळूण : अगोदरच सर्व व्यापारी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. जनता मेटाकुटीस आली आहे. आता जास्त अटी आणि शर्थी नको. सर्व व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मोकळीक द्यावी. आता कोणत्याही व्यावसायिकांवर अन्याय नको, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असताना जिल्ह्यात कडक लॉकडाउन जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. व्यापारी आणि जनतेच्या संतापाची दखल घेत कडक निर्बंध रद्द करण्यात आले; मात्र अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. यामुळेच पुन्हा अनेक अडचणींना व्यावसायिक, व्यापारी यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने अटी-शर्थी ठेवून व्यावसायिकांना परवानगी दिली असली तरी या व्यावसायिकांना धड व्यापार पण करता येणार नाही. या संदर्भात आमदार निकम यांनी आवाज उठवला असून, पालकमंत्री परब आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे या अटी-शर्थीही रद्द करण्याची मागणी केली आहे.

व्यावसायिकांना वेळेचे बंधन दिले आहे. एकतर अगोदर दोन-अडीच महिने व्यवसायाची वाट लागली आहे. त्यात पावसाळ्याचे दिवस दिलेल्या वेळेत खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात. मग या गर्दीला कसा आवर घालणार ? यासाठी आता वेळेचे बंधन नको, अशी मागणी निकम यांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग असले पाहिजे. गर्दी कुठेही होऊ नये. कोरोनाचे उच्चाटन करायचे आहे. यासाठी हे निर्बंध असले पाहिजेत; मात्र त्यासाठी छोटे-मोठे व्यापारी वेठीस नको. अगोदरच लॉकडाउनने सारे मेटाकुटीस आले आहेत. आता वाहतूक आणि अन्य व्यवस्था सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जे जे व्यावसायिक, व्यापारी आहेत त्यांना आपला व्यवसाय करून घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT